महाराष्ट्र ग्रामीणराजकारण
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते शिवसेना नेते किशोरभाई जैन यांचा राष्ट्रवादीत भव्य प्रवेश सोहळा
नागोठण्यातील प्रवेश सोहळ्यास खा.सुनील तटकरे, ना. आदितीताई तटकरे, अनिकेतभाई तटकरे यांची प्रमुख उपस्थिती

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते शिवसेना नेते किशोरभाई जैन यांचा राष्ट्रवादीत भव्य प्रवेश सोहळा
नागोठण्यातील प्रवेश सोहळ्यास खा.सुनील तटकरे, ना. आदितीताई तटकरे, अनिकेतभाई तटकरे यांची प्रमुख उपस्थिती
नवनिर्वाचित रोहा नगराध्यक्षा व नगरसेवकांचा होणार सत्कार
महेश पवार
नागोठणे : शिवसेना उबाठा पक्षाचे दक्षिण रायगड जिल्ह्यातील नेते आणि रायगड जिल्हा सहसंपर्क प्रमुख तसेच रायगड जिल्हा परिषदेच्या नागोठणे गटाचे माजी सदस्य किशोरभाई जैन हे शिवसेना उबाठा नागोठणे विभाग प्रमुख संजय भोसले, नागोठणे ग्रामपंचायतीच्या सरपंच सुप्रियाताई महाडिक, नागोठण्याचे पहिले लोकनियुक्त सरपंच व विद्यमान सदस्य डॉ मिलिंद धात्रक यांच्यासह नागोठणे शहर व विभागातील सरपंच, पदाधिकारी आणि आपल्या असंख्य कार्यकर्ते व सहकाऱ्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये सोमवार दिनांक ५ जानेवारी रोजी जाहीर प्रवेश करीत आहेत. या प्रवेश सोहळ्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे, महिला व बालविकास मंत्री आदितीताई तटकरे, विधानपरिषदेचे माजी आमदार अनिकेतभाई तटकरे आदींसह जिल्ह्यातील व रोहा तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. दरम्यान नागोठणे शहरात या प्रवेश सोहळ्याचे स्वागत कमानी व बॅनर सर्वत्र झळकत असल्याने नागोठणे शहर राष्ट्रवादीमय झाल्याचे दिसून येत आहे.

नागोठण्यातील एस. टी. स्थानकालगत असलेल्या भव्य आठवडा बाजार मैदानावर सोमवार दिनांक ५ जानेवारी रोजी दुपारी १ वाजता संपन्न होणाऱ्या
या भव्य पक्ष प्रवेश सोहळ्याची जय्यत तयारी नागोठण्यात सुरू असून विधानपरिषदेचे माजी आमदार अनिकेतभाई तटकरे यांनी शनिवार दिनांक ४ जानेवारी रोजी सायंकाळी सभेच्या ठिकाणी येऊन सभेच्या पूर्व तयारी संदर्भात आढावा घेतला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नागोठणे विभागीय नेते भाई टके, शिवरामभाऊ शिंदे, सदानंद गायकर, मधुकर ठमके,विलास चौलकर, विभागीय अध्यक्ष संतोषभाई कोळी, शहर अध्यक्ष बाळासाहेब टके, अनिकेतभाई तटकरे यांचे स्वीय सहाय्यक उमेश लोखंडे आदींसह राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते यावेळी बहुसंख्येने उपस्थित होते. दरम्यान या प्रवेश सोहळ्यामुळे नागोठणे ग्रामपंचायतीवर अनेक वर्षांनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडकणार असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या नागोठणे शहर व विभागातील कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे.





