निवडणूकमहाराष्ट्र ग्रामीणराजकारण

किशोर जैन यांच्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते  कृष्णा धामणे यांचा पक्षाचा राजीनामा 

कृष्णा धामणे यांचा पत्रकार परिषदेत धक्कादायक खुलासा 

किशोर जैन यांच्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते  कृष्णा धामणे यांचा पक्षाचा राजीनामा 

कृष्णा धामणे यांचा पत्रकार परिषदेत धक्कादायक खुलासा 
रायगडचा बुलंद आवाज टीम 
नागोठणे :  किशोर जैन यांच्यामुळे मी पूर्वी शिवसेना सोडली आणि आता मला विश्वासात न घेता किशोर जैन यांना राष्ट्रवादीत प्रवेश दिला गेला.  त्यामुळे मी खुप नाराज असून या नाराजीमुळे नागोठणे विभागातील कोंडगाव ग्रामपंचायतीचे माजी सरपंच तथा राष्ट्रवादी काँग्रेस रोहा तालुका उपाध्यक्ष कृष्णा धामणे यांनी आपल्या पदाचा व पक्षाचा राजीनामा तालुका अध्यक्ष विनोद पाशिलकर यांच्याकडे सादर केला असल्याचे कृष्णा धामणे यांनी पत्रकार परिषदत सांगितले. नागोठण्याजवळील चिकणी येथील हॉटेल प्रियांका येथे गुरुवार दिनांक ५ फेब्रुवारी रोजी सकाळी घेण्यात आलेल्या या पत्रकार परिषदेत शिंदे शिवसेना युवा नेते हरीश धामणे व विनोद धामणे उपस्थित होते.  जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेला दोन दिवस शिल्लक असतानाच कृष्णा धामणे यांनी दिलेल्या राजीनाम्यामुळे राष्ट्रवादीला धक्का बसला आहे.
आपली पुढील भूमिका स्पष्ट करतांना कृष्णा धामणे म्हणाले की,
रायगड जिल्हा परिषदेच्या नागोठणे गटाचे शिवसेना उमेदवार सुमित काते यांच्या प्रचारार्थ आमदार महेंद्रशेठ दळवी आज नागोठण्यातील मराठा आळी येथील कॉर्नर सभेला येत असल्याने त्यांच्या उपस्थितीत आपण आपल्या कोंडगाव गावातील व कोंडगाव ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या शेतपळस, निडी या गावातील तसेच कातळवाडी पायरवाडी, एकळघर (तळई) या  आदिवासी वाड्यांमधील माझे कार्यकर्ते व माझे समर्थक माझ्यासोबत शिंदे शिवसेनेत प्रवेश करीत असल्याचे यावेळी कृष्णा धामणे यांनी स्पष्ट केले.
दरम्यान माझा खासदार सुनिल तटकरे साहेब परिवार तसेच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांवर कुठलीही नाराजी नसल्याचे यावेळी कृष्णा धामणे यांनी स्पष्ट केले. दरम्यान माझा खासदार सुनिल तटकरे साहेब व  परिवार तसेच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांवर कुठलीही नाराजी व मतभेद नसल्याचे यावेळी कृष्णा धामणे यांनी स्पष्ट केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!