निवडणूकमहाराष्ट्र ग्रामीणराजकारण
किशोरभाई जैन व योगिता शिद यांना मोठे मताधिक्य देण्याचा पाटणसई ग्रामस्थांचा निर्धार
पाटणसई येथील युतीच्या प्रचार बैठकीला उत्स्फूर्त प्रतिसाद

किशोरभाई जैन व योगिता शिद यांना मोठे मताधिक्य देण्याचा पाटणसई ग्रामस्थांचा निर्धार
पाटणसई येथील युतीच्या प्रचार बैठकीला उत्स्फूर्त प्रतिसाद
महेश पवार
नागोठणे : रायगड जिल्हा परिषद व रोहा पंचायत समितीच्या पंचवार्षिक सार्वत्रिक निवडणुकीतील प्रचाराचा धुमधडाका नागोठणे विभागात सर्वत्र दिसून येत आहे. अशाच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व भारतीय जनता पार्टीचे नागोठणे जिल्हा परिषद गटाचे उमेदवार किशोरभाई जैन व सुकेळी पंचायत समिती गणाच्या उमेदवार सौ. योगिता शिद यांच्या प्रचारार्थ पाटणसई येथे रोहा पंचायत समितीचे माजी सभापती सदानंद गायकर यांच्या निवासस्थानी शनिवारी (दि.३१) संपन्न झालेल्या प्रचार बैठकीला पाटणसई ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचे पहावयास मिळाले. या बैठकीच्या निमित्ताने किशोरभाई जैन व योगिता शिद यांना मोठे मताधिक्य देण्याचा निर्धार पाटणसई ग्रामस्थांनी केला.

या बैठकीत सर्व ग्रामस्थांनी जाहीर पाठिंबा देत किशोरभाई जैन व योगिता शिद यांना मनापासून शुभेच्छा दिल्या. विकास, विश्वास आणि एकजुटीचा ठाम संदेश या सभेतून स्पष्टपणे समोर आला असून उपस्थित ग्रामस्थांची संख्या पाहता येथीलएकजूट मजबूत आहे, दिशा स्पष्ट आहे आणि त्यामुळे आमचा विजय निश्चित आहे असा विश्वास यावेळी उमेदवार किशोरभाई जैन यांनी व्यक्त केला. तर रोहा पंचायत समितीचे माजी सभापती आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे विभागीय नेते सदानंद गायकर यांनी आपल्या मनोगतात पाटणसई गावातून किशोरशेठ जैन व योगिता शिद यांना कधी नव्हे एवढे मोठे मताधिक्य देणार असल्याचा विश्वास व्यक्त केला.

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक प्रचाराच्या अनुषंगाने पाटणसई गावात पार पडलेल्या या निर्णायक बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे विभागीय नेते भाई टके, शिवरामभाऊ शिंदे, सदानंद गायकर, मधुकर ठमके, उमेदवार किशोरभाई जैन, योगिता शिद, भाजपाचे ज्येष्ठ नेते महादेव मोहिते, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष सोपान जांबेकर, तालुका सरचिटणीस एकनाथ ठाकूर, संजय भोसले, हेमंत गायकर, पांडुरंग गायकर, राष्ट्रवादीचे नागोठणे विभागीय कार्याध्यक्ष सचिन कळसकर, भाई शिर्के, हरिश्चंद्र तेलंगे, मधुकर गायकर, मारुती शिर्के, अकबर पठाण, विकास म्हात्रे आदींसह राष्ट्रवादी काँग्रेस व भारतीय जनता पक्षाच्या युतीचे प्रमुख पदाधिकारी, युतीचे विभागातील सरपंच, उपसरपंच यांच्यासह पाटणसई गावातील ग्रामस्थ व महिला यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.




