निवडणूकमहाराष्ट्र ग्रामीणराजकारण

नागोठणे जिल्हा परिषद मतदारसंघ जिल्ह्यात अद्ययावत असेल

किशोरभाई जैन यांनी पत्रकार परिषदेत मांडले विकासाचे व्हिजन

नागोठणे जिल्हा परिषद मतदारसंघ जिल्ह्यात अद्ययावत असेल

किशोरभाई जैन यांनी पत्रकार परिषदेत मांडले विकासाचे व्हिजन

रायगडचा बुलंद आवाज टीम 

नागोठणे : खासदार सुनील तटकरे साहेब, मंत्री आदितीताई तटकरे, माजी आमदार अनिकेतभाई तटकरे यांचे नेतृत्व हे आपल्या जवळचे आणि कधीही उपलब्ध होऊ शकणारे आहे. त्यामुळेच आपण विकासाच्या मुद्द्यावरच सत्तेत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. विभागातील युतीच्या सर्व कार्यकर्त्यांच्या मनात विकास हेच ध्येय आहे आणि तटकरे साहेबांकडे मी टाकलेला शब्द ते कधीच खाली पडू देत नाही त्यामुळे त्यांनी केवळ मला राजकारणासाठी जवळ घेतलेले नाही हे सिद्ध झाले आहे. खा. धैर्यशील पाटील, आमदार रवीशेठ पाटील, मंत्री आदितीताई, अनिकेतभाई या सर्वच नेत्यांचे माझ्याकडे लक्ष असल्याने भविष्यात नागोठणे जिल्हा परिषद मतदारसंघ सर्व सोयी सुविधांनी अद्ययावत व रोल मॉडेल म्हणून विकसित करणार याची हमी जिल्हा परिषदेच्या नागोठणे गटाचे राष्ट्रवादी व भाजपा युतीचे उमेदवार किशोरभाई जैन यांनी पत्रकार परिषदेत दिली.

 

किशोरभाई जैन मंगळवारी(दि.२) सायंकाळी युतीच्या प्रचार कार्यालयात घेतलेल्या या पत्रकार परिषदेला उमेदवार किशोरभाई जैन, योगिता शिद, राष्ट्रवादीचे विभागीय नेते भाई टके, शिवरामभाऊ शिंदे, हरेशशेठ काळे, बाळासाहेब टके, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष सोपनभाऊ जांबेकर, अनंत वाघ, गणपत म्हात्रे, संतोष लाड, भाई शिर्के, अपर्णा सुटे आदींसह युतीचे कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

किशोरभाई जैन यांनी या पत्रकार परिषदेत निवडणुकीतील त्यांच्या “विरोध नाही, फक्त विकासाची लढाई” या ब्रीद वाक्यावर नागोठणे मतदार संघासाठी विकासाचे व्हिजन सादर करतांना सांगितले की, जिल्ह्याचे मध्यवर्ती ठिकाण असलेल्या नागोठणे शहर परिसरात रिलायन्सचा २५ हजार कोटींचा उद्योग उभारण्याचे काम सुरू असून त्यातील एक टक्का आपल्या वाट्याला घेऊन येथे जामनगरच्या धर्तीवर विकास आणि व्यवसाय व रोजगार निर्मितीसाठी आपला प्रयत्न असेल, येथील अंबा नदीतील गाळ महाड व चिपळूण येथील नदीच्या धर्तीवर काढून किनाऱ्याला संरक्षण भिंत बांधून छोट्या पुरापासून नागोठणेकरांचे संरक्षण करणे, रोहा व पेण तालुक्यांतील गावे, आदिवासी वाड्या त्यांना एकत्र करून नागोठणे या नवीन तालुक्याची निर्मिती करणे, नागोठण्यातील शुद्ध पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करतानाच शुद्ध पाणी व रॉ वॉटर यांचे स्वतंत्र जलवाहिन्या सुरू करणे, सतीचा माळ येथील मैदान तरुणांसाठी सुरू करण्यात आले असले तरी ते अद्ययावत करणे, नागोठणे शहर व विभागातील विजेचा प्रश्न सोडवण्यासाठी नागोठण्यासाठी स्वतंत्र वीज फीडर सुरू करणे, नागोठणे प्राथमिक आरोग्य केंद्राला आठ कोटी रुपयांच्या निधीची तांत्रिक मान्यता मिळाले असल्याने त्या माध्यमातून आरोग्याच्या चांगल्या दर्जाच्या सुविधा उपलब्ध करून देणे, प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत असलेले सर्व उपकेंद्र सुस्थितीत करणे, मंत्री आदितीताई तटकरे यांनी नुकत्याच झालेल्या महिला मेळाव्यात जाहीर केल्याप्रमाणे नागोठणे ग्रामपंचायतीच्या जुन्या इमारतीच्या जागेवर प्रस्तावित अद्ययावत अशा सात मजली इमारतीमध्ये महिलांसाठी जिल्हास्तरीय प्रशिक्षण केंद्र व महिला भवन तसेच इतर सर्व आवश्यक ती कार्यालय सुरू करणे, विभागातील व जिल्ह्यातील तरुणांचा शिक्षणाच्या सोयी सुविधांसाठी भारतीय एज्युकेशन सोसायटीच्या विद्या संकुलात युनिव्हर्सिटीचा दर्जा मिळवण्यासाठी प्रयत्न करणे, या विद्या संकुलात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना येथेच सहजपणे नोकऱ्या उपलब्ध व्हाव्या यासाठी नागोठण्यात स्वतःचे एम्प्लॉयमेंट एक्सचेंज सुरू करणे, नागोठणे रेल्वे स्थानकाचे सुशोभीकरण करण्यासह स्थानकात लांब पल्ल्याच्या गाड्यांना थांबा मिळण्यासाठी प्रयत्न करणे, नियोजित नागोठणे एस.टी. स्थानकात प्रवाशांना सर्व सोयी सुविधा व विविध स्टॉलची उभारणी करणे, पूरग्रस्त नागोठणे शहरातील विविध भागांसाठी पायाभूत सुविधा व आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा कार्यान्वित करणे, मतदारसंघातील प्रत्येक गावात शिवस्मारक उभारून येथील परिसराची सुशोभीकरण करणे, प्रत्येक गावात सामाजिक सभागृह उभारणे, ज्येष्ठ नागरिकांसाठी सभागृह व विविध सुविधा उपलब्ध करणे, रिलायन्स कंपनीच्या सहकार्याने कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी कचरा व्यवस्थापन नियोजन करणे, वासगाव रस्त्याप्रमाणेच वाघ्रणवाडी आदिवासी वाडी येथील रस्ता करण्यासाठी वन खात्याच्या अडचणी दूर करून रस्ता करणे, वाडी वस्त्यांना हक्काचे गावठाण मिळवून देणे यांसह नागोठणे जिल्हा परिषद मतदार संघासाठी युतीमधील सर्व पमुख नेत्यांचे सहकार्य घेऊन नागोठणे मतदार संघाचा सर्वांगीण विकास करण्याचे काम मला करण्या करायचे असल्याचे शेवटी किशोर जैन यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!