कायदेविषयकगुन्हेगारी वृत्तनिवडणूकमहाराष्ट्र ग्रामीण

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नागोठण्यात पोलिसांचा रूट मार्च

नागोठण्यातील विविध भागातील सुरक्षेचा घेतला आढावा

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नागोठण्यात पोलिसांचा रूट मार्च

नागोठण्यातील विविध भागातील सुरक्षेचा घेतला आढावा

नागोठणे :  महेश पवार

रायगड जिल्हा परिषद व पंचायत समितीची सार्वत्रिक पंचवार्षिक निवडणूक मतदान प्रक्रिया येत्या ७ फेब्रुवारी रोजी संपन्न होत आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बुधवार दि. ४ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५.३० ते ६.३० वाजण्याच्या दरम्यान नागोठणे पोलिस ठाण्याच्या पोलिस पथकाकडून नागोठणे पोलीस ठाणे हद्दीतील नुक्कड गल्ली, छत्रपती श्री शिवाजी महाराज चौक, कोळीवाडा, हुजरा मोहल्ला, के.एम.जी. विभाग, खुमाचा नाका, बाजारपेठ व परिसरात रूट मार्च घेण्यात आला.

या रूट मार्च मधून नागोठण्यातील विविध भागातील सुरक्षेचा आढावा घेण्यात आला. या रूट मार्च मध्ये दोन पोलिस अधिकारी, ४० पोलिस अंमलदार, ३० होमगार्ड यांनी सहभाग घेतला होता. हा रूट मार्च यशस्वी करण्यासाठी नागोठणे पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी स.पो.नि सचिन कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक नरेश थळकर व पोलिस कर्मचारी यामध्ये सहभागी झाले होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!