निवडणूकमहाराष्ट्र ग्रामीणराजकारण

शिवसेनेच्या उमेदवारांना निवडून दिले तर कुठल्याही कामासाठी निधी कमी पडू देणार नाही

नागोठण्यातील ऐतिहासिक सभेत ना. भरतशेठ गोगावले यांनी नागोठणेकरांना दिले अभिवचन

शिवसेनेच्या उमेदवारांना निवडून दिले तर कुठल्याही कामासाठी निधी कमी पडू देणार नाही 

नागोठण्यातील ऐतिहासिक सभेत ना. भरतशेठ गोगावले यांनी नागोठणेकरांना दिले अभिवचन

रायगडचा बुलंद आवाज टीम 

नागोठणे : धनशक्तीच्या विरोधात जनशक्ती म्हणून आम्ही आपल्याकडे सर्वसामान्य कुटुंबातील व शेतकऱ्यांची मुले उमेदवार म्हणून दिलेले आहेत. त्या उमेदवारांकडे कॉलेज, हॉस्पिटल व पतपेढी नाही. आता काही लोकांची मक्तेदारी मोडून काढायची आहे. मी महाराष्ट्राचा मंत्री असलो तरी पाहिला रायगडचा सुपुत्र असल्यामुळे विकासाच्या बाबतीत रायगडसाठी झुकते माप देण्याचे काम मी आता पर्यंत केलेले आहे. काही लोक बोलतात अशी कॅच पकडली, अशी विकेट काढली परंतु येत्या ७ फेब्रुवारीला धनुष्य व माशालीचे बटण दाबून समोरच्या उमेदवाराची विकेट काढून ९ फेब्रुवारीला विजयी मिरवणूक काढू. शिवसेनेच्या उमेदवारांना आपण निवडून दिले तर कुठल्याही कामासाठी निधी कमी पडू देणार नाही ही जबाबदारी माझी असे अभिवचन महाड पोलादपूरचे आमदार व महाराष्ट्र राज्याचे रोजगार हमी मंत्री ना. भरतशेठ गोगावले यांनी नागोठण्यातील ऐतिहासिक सभेत बहुसंख्येने उपस्थित जनसमुदायाला दिले. दरम्यान या सभेस महिला वर्गाची उपस्थिती लक्षणीय होती. दरम्यान सभेच्या प्रारंभी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

परिवर्तन विकास आघाडीच्या(शिंदे शिवसेना, ठाकरे शिवसेना, काँग्रेस व आरपीआय आघाडीचे जि. प. नागोठणे गटाचे शिंदे शिवसेनेचे उमेदवार सुमितदादा काते, पंचायत समितीच्या नागोठणे गणाच्या ठाकरे शिवसेनेच्या उमेदवार अंजली हिराजी दुर्गावले व पंचायत समितीच्या सुकेळी गणातील ठाकरे शिवसेनेच्या उमेदवार अरुणा हंबीर यांच्या प्रचारार्थ नागोठण्यातील गांधी चौकात रविवारी (दि.१) रात्री संपन्न झालेल्या भव्य सभेत ना.भरतशेठ गोगावले मार्गदर्शन करताना बोलत होते. यावेळी ना. भरतशेठ गोगावले यांच्या समवेत जिल्हा परिषदेचे उमेदवार सुमितदादा काते, पंचायत समितीचे उमेदवार अंजली दुर्गावले व अरुणा हंबीर, ठाकरे शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख प्रसाददादा भोईर, शिंदे शिवसेना रोहा तालुका प्रमुख ॲड. मनोजकुमार शिंदे, उपतालुका प्रमुख मनोजदादा खांडेकर, शिंदे शिवसेना विभाग प्रमुख प्रविण ताडकर, शहर प्रमुख संतोष चितळकर, प्रकाश मोरे, दिनेश घाग, सचिन भोसले, मंदार कोतवाल, संजय कणघरे, इम्रान पानसरे, नागोठणे माजी सरपंच भारती सिंगासने, महिला उपतालुका प्रमुख वर्षां सहस्रबुद्धे, ठाकरे शिवसेनेच्या नागोठणे ग्रामपंचायत सदस्या ज्योती राऊत, काँग्रेस शहर अध्यक्ष अशपाक पानसरे, ग्रामपंचायत सदस्या शबाना मुल्ला, माजी सरपंच निलोफर पानसरे, असिफ मुल्ला, सागिर अधिकारी, सोहेल पानसरे, आरपीआय पेण ता. अध्यक्ष एम. डी. कांबळे, रोहा ता. अध्यक्ष संतोष गायकवाड, अजित दळवी आदींसह परिवर्तन आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागोठणे शहर व विभागातील नागरिक यावेळी बहुसंख्येने उपस्थित होते.

नागोठणे जिल्हा परिषद गटातील उमेदवार सुमितदादा काते उपस्थित जनसमुदयास संबोधित करताना म्हणाले की, मी कुठलाही नेता नसून एक सर्वसामान्य कार्यकर्ता आहे. मी नागोठणे विभागातील गावागावात गेलो तेव्हा मला प्रत्येक गावातील समस्या काय आहेत ते समजले. गावातील तरुणांना रोजगार नाही. आपल्या भागात मोठामोठया कंपन्या असून सुद्धा तरुणांना नोकरीसाठी आपले गाव सोडून मुंबई वा इतर ठिकाणी जावे लागते हे फार मोठे दुर्दैव्य आहे. नागोठणे सारख्या मोठया गावाला गेले कित्येक वर्ष शुद्ध पाणी मिळत नाही. याचे दुःख वाटते म्हणून आपल्या सर्व समस्या सोडविण्यासाठी मी निवडणूक रिंगणात उतरलो असून मला, अंजलीताई दुर्गावले व अरुणाताई हंबीर यांना भरघोस मतांनी निवडून द्या अशी विनंती शेवटी सुमितदादा काते यांनी उपस्थित जनसमुदायाला केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!