सुमितदादा काते यांचा विजय काळ्या दगडावरील पांढरी रेष

सुमितदादा काते यांचा विजय काळ्या दगडावरील पांढरी रेष
शिंदे शिवसेना नेते विजय धामणे यांचा ठाम विश्वास
रायगडचा बुलंद आवाज टीम
नागोठणे : आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नागोठणे जिल्हा परिषद गटातील शिंदे शिवसेनेचे उमेदवार सुमितदादा काते यांच्या विजयावर शिक्कामोर्तब झाल्याचे स्पष्ट मत व्यक्त करून स्थानिक पातळीवर मिळणारा जनतेचा वाढता पाठिंबा, स्वखर्चाने केलेली विकासकामे आणि जनतेशी असलेला थेट संवाद यामुळे सुमितदादा काते यांचा विजय काळ्या दगडावरील पांढरी रेष असल्याचा ठाम विश्वास शिंदे शिवसेनेचे नेते विजय धामणे यांनी व्यक्त केला. दरम्यान कोंडगाव ग्रामपंचायत हद्दीतील सर्व वाड्या व गावांमध्ये सुमितदादा काते यांना प्रचंड मताधिक्य देणार असल्याचेही विजय धामणे यांनी स्पष्टपणे सांगितले.
विजय धामणे पुढे म्हणाले की, सुमितदादा काते यांनी मतदारसंघात पायाभूत सुविधा, रस्ते, पाणीपुरवठा, शिक्षण व युवकांसाठी विविध विकासाभिमुख उपक्रम प्रभावीपणे राबविण्याचा प्रयत्न केलेला आहे. या कामांची पोहोच सामान्य नागरिकांपर्यंत झाल्याने नागरिकांमध्ये समाधानाची भावना निर्माण झाली आहे. त्यामुळे जनता स्पष्टपणे सुमितदादा काते यांच्या पाठीशी उभी आहे.
तळागाळातील कार्यकर्ते, युवक व महिला वर्गामध्ये मोठ्या प्रमाणावर उत्साह पाहायला मिळत असून संघटनात्मक पातळीवरही पक्ष मजबूत असल्याचे चित्र दिसत आहे. विरोधकांकडे ठोस मुद्द्यांचा अभाव असून विकासाच्या मुद्द्यावर सुमितदादा काते यांना तोडीस तोड प्रतिस्पर्धी नाही, असा टोलाही विजय धामणे यांनी लगावला. एकंदरीतच जनतेचा कौल, कार्यकर्त्यांची ताकद आणि विकासाची भक्कम पायाभरणी पाहता सुमितदादा काते यांचा विजय निश्चित आहे, असे स्पष्ट मत शिंदे शिवसेना नेते विजय धामणे यांनी व्यक्त केले.




