निवडणूकमहाराष्ट्र ग्रामीणराजकारण
वरवठणे प्रभाग क्रमांक ३ मध्ये शिवसेना उमेदवार सुमित काते यांना मताधिक्य देण्याचा निर्धार
युवा नेते संतोष बैकर यांच्यासह महिला वर्गाचा सुमितदादा काते यांना जाहीर पाठिंबा

वरवठणे प्रभाग क्रमांक ३ मध्ये शिवसेना उमेदवार सुमित काते यांना मताधिक्य देण्याचा निर्धार
शिंदे शिवसेना युवा नेते संतोषभाई बैकर यांच्यासह महिला वर्गाचा सुमितदादा काते यांना जाहीर पाठिंबा
रायगडचा बुलंद आवाज टीम
नागोठणे : नागोठणे जिल्हा परिषद गटातील शिंदे शिवसेनेचे उमेदवार सुमितदादा काते व सुकेळी पंचायत समिती गणातील ठाकरे शिवसेनेच्या उमेदवार अरुणा हंबीर यांच्या प्रचारार्थ वरवठणे गावातील सामाजिक कार्यकर्ते संतोष बैकर यांच्या पुढाकाराने त्यांच्या निवासस्थानी सोमवारी (दि. २) रात्री घेण्यात आलेल्या प्रभाग क्रमांक ३ मधील महिला वर्गाच्या बैठकीत महिला वर्गाने सुमितदादा काते व अरुणा हंबीर यांना जाहीर पाठिंबा देऊन प्रभाग क्रमांक ३ मध्ये भरघोस मताधिक्य देणार असल्याचा निर्धार केला.
वरवठणे प्रभाग क्रमांक ३ मधील महिला वर्गाच्या बैठकीस उमेदवार सुमितदादा काते, अरुणा हंबीर, शिवसेना रोहा उपतालुका प्रमुख मनोजदादा खांडेकर, ठाकरे शिवसेनेचे नेते वरवठणे ग्रामपंचायत सदस्य गणपत म्हात्रे तसेच शिंदे शिवसेना, ठाकरे शिवसेना व आरपीआय पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यासह वरवठणे प्रभाग क्रमांक ३ मधील ग्रामस्थ व शिंदे शिवसेना युवा नेते संतोषभाई बैकर, युवा नेते योगेश नाईक, सुरेश करजेकर, सुहास दांडेकर, ऋतिक करजेकर, प्रतिक करजेकर, ज्ञानेश्वर वारगे, चंद्रकांत वारगे, नथुराम शेडगे, दत्ता बैकर, विश्वास करजेकर, रघुनाथ दांडेकर, सुरेश बैकर, संतोष माळी, अनंत करजेकर, अक्षय नाकटे, साक्षी बैकर, साधना वारगे, निकिता वारगे, स्नेहा दांडेकर, निता दांडेकर, बेबी करजेकर, पुष्पा करजेकर, लतिका शेडगे, लक्ष्मी वालेकर, नैना वालेकर, रजनी दांडेकर, वृषाली नाकटे, चिमा माळी, सुनिता बैकर आदी ग्रामस्थ उपस्थित होते.




