निवडणूकमहाराष्ट्र ग्रामीणराजकारण

युतीधर्म पाळून दोन्ही उमेदवारांना निवडून आणायचे आहे : हरिश्चंद्र तेलंगे 

वांगणीतील गाव बैठकीला उत्स्फूर्त प्रतिसाद 

युतीधर्म पाळून दोन्ही उमेदवारांना निवडून आणायचे आहे : हरिश्चंद्र तेलंगे 

वांगणीतील गाव बैठकीला उत्स्फूर्त प्रतिसाद 
महेश पवार 
नागोठणे : लोकसभा निवडणुकीत खासदार सुनील तटकरे यांना भरघोस मते देऊन केंद्रात पाठविले व विधानसभा निवडणुकीत आमदार रवीशेठ पाटील यांना निवडून दिले त्याप्रमाणेच जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपा या आपल्या दोन्ही पक्षातील कार्यकर्त्यांना युतीधर्म पाळून आपले जिल्हा परिषदेचे उमेदवार किशोरशेठ जैन व पंचायत समिती उमेदवार योगिता शिद या दोघांना  भरघोस मतांनी निवडून आणायचे आहे असे आवाहन राष्ट्रवादीचे कार्यकर्ते हरिश्चंद्र तेलंगे यांनी वांगणीतील गाव बैठकीत केले. याचवेळी विरोधकांच्या कोणत्याही भूलथापांना बळी पडू नका असेही त्यांनी उपस्थित ग्रामस्थांना सांगितले. यावेळी एकनाथ ठाकूर, मोरेश्वर तेलंगे, महादेव मोहिते, किशोरभाई म्हात्रे यांनीही आपल्या मनोगतातून किशोरशेठ यांच्या कार्याची माहिती देत दोन्ही उमेदवारांना निवडून देण्याचे आवाहन केले.
रायगड जिल्हा परिषदेच्या नागोठणे गटाचे राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपा युतीचे उमेदवार किशोरशेठ जैन व पंचायत समितीच्या सुकेळी गणाच्या उमेदवार योगिता शिद यांच्या प्रचारार्थ वांगणी येथे हरिश्चंद्र तेलंगे यांच्या निवासस्थानी मंगळवारी (दि.२७) सायंकाळी संपन्न झालेल्या या बैठकीला राष्ट्रवादीचे विभागीय नेते भाई टके, शिवरामभाऊ शिंदे, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष सोपान जांबेकर, महादेव मोहिते, संजय भोसले, भाजपाचे तालुका सरचिटणीस एकनाथ ठाकूर, मधुकर तेलंगे, राष्ट्रवादीचे विभागीय युवक अध्यक्ष प्रमोद जांबेकर, हरिश्चंद्र तेलंगे, मोरेश्वर तेलंगे, किशोरभाई म्हात्रे, राजू शिंदे, किशोर कदम, ज्ञानेश्वर शिर्के, भाई शिर्के, भगवान शिद,  प्रकाश रेवाळे, हरीश टके, गणेश जाधव, किशोर मांडलुस्कर, दिनेश कातकरी आदींसह युतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ यावेळी बहुसंख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!