महाराष्ट्र ग्रामीण
भाजपाची दिल्लीत सत्ता आल्याने नागोठण्यातील कार्यकर्त्यांनी केला जल्लोष !
फटाके फोडून व पेढे वाटून साजरा केला आनंद

भाजपाची दिल्लीत सत्ता आल्याने नागोठण्यातील कार्यकर्त्यांनी केला जल्लोष !
फटाके फोडून व पेढे वाटून साजरा केला आनंद
नागोठणे : भारतीय जनता पार्टीने दिल्ली विधानसभा निवडणुकीत ४८ जागा जिंकून
एक हाती सत्ता मिळवीत दिल्ली काबीज केली. भाजपच्या या अभूतपूर्व विजयाचा जल्लोष व आनंदोत्सव नागोठण्यातील भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात, बाजार पेठेत शनिवारी (दि. ८) सायंकाळी फटाक्याची आतिषबाजी करून व पेढे वाटून विजय उत्सव साजरा केला.

नरेंद्र मोदी आगे बढो, हम तुम्हारे साथ है या घोषणांनी परिसर दणाणून गेला.
भाजपाचे नागोठणे शहर अध्यक्ष सचिन मोदी यांनी सांगितले की, २७ वर्षानंतर दिल्लीमध्ये भारतीय जनता पार्टीची सत्ता आली आहे. त्यामुळे निश्चितच सगळ्यांना आनंद आहे. मोदीची गॅरंटी या एका फॅक्टरमुळे ही सत्ता आली आहे. अमित शहा यांनीही सूक्ष्म नियोजन केले. तसेच सर्व कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी घेतलेल्या मेहनतीचे हे फळ आहे. आता मोदीजी व अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली दिल्लीच्या रखडलेला विकास चांगल्या पद्धतीने होईल. यावेळी सचिन मोदी यांनी दिल्लीतील सर्व मतदारांचे आभार मानले.
यावेळी भाजपा रोहा तालुका सरचिटणीस आनंद लाड, शहराध्यक्ष सचिन मोदी, तालुका क्रीडा संयोजक शेखर गोळे, धनराज उमाळे, अशोक अहिरे, विवेक रावकर, अंकुश सुटे, संजय पानकर, हेमंत जांबेकर, संजय नांगरे, सगीर पानसरे, सुदेश येरुणकर, गौतम जैन आदींसह कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.