महाराष्ट्र ग्रामीण
श्री स्वामी समर्थ व नवनाथ मठात गुरुवारची आरती उत्साहात
स्वामी सेविका सौ. माधुरी बिपिन सोष्टे यांना आरतीचा मान

श्री स्वामी समर्थ व नवनाथ मठात गुरुवारची आरती उत्साहात
स्वामी सेविका सौ. माधुरी बिपिन सोष्टे यांना आरतीचा मान

नागोठणे : नागोठण्यातील खडक आळीतील श्री स्वामी समर्थ व नवनाथ मठात दर गुरुवारची आरती सायंकाळी ६.३० वाजता नित्यनियमाने घेतली जाते. या आरतीसाठी नागोठणे शहर व विभागातील स्वामी भक्त नागरिक व स्वामी सेवेकरी आवर्जून उपस्थित राहून सुमारे अर्धा तास चालणाऱ्या आरती मध्ये भक्तिभावाने सहभागी होत असतात.

खडक आळीतील श्री स्वामी समर्थ मठात दर गुरुवारी होणाऱ्या या आरतीसाठी स्वामी सेवकांना आरती घेण्याचा मान मिळत असतो. अशाप्रकारे वर्षभर अनेक स्वामी सेवकांना मठात आरतीचा घेण्याचा मान आजपर्यंत मिळाला आहे. अशाचप्रकारे आज गुरुवार दिनांक २० फेब्रुवारी रोजी संध्याकाळी ६.३० वाजता आरती घेण्याचा मान स्वामी सेविका सौ. माधुरी बिपिन सोष्टे यांना मिळाला. सौ. माधुरी सोष्टे यांना आरती घेण्याचा योग आज आल्याने त्यांनीही मनोभावे श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती घेऊन श्री स्वामी समर्थ महाराजांची यथासांग पूजाही केली. या आरतीसाठी नागोठणे शहर व विभागातील स्वामीभक्त नागरिक व स्वामी सेवक बहुसंख्येने उपस्थित होते.