
कानसई येथील राष्ट्रवादीचे नेते मोहन पवार यांना पत्नीशोक
ऐनघर पंचक्रोशीत हळहळ
दिनेश ठमके
सुकेळी : रोहा तालुक्यातील प्रसिद्ध व्यावसायिक, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते तथा बिजली हाॅटेल व नवरत्न हाॅटेलचे मालक मोहन पवार यांच्या पत्नी व राष्ट्रवादी काॅग्रेस पक्षाचे रोहा तालुका युवक उपाध्यक्ष निवास पवार यांच्या मातोश्री मनिषा मोहन पवार यांचे शुक्रवार दि. २१ फेब्रुवारी २०२५ रोजी अल्पशा आजाराने आकस्मित निधन झाले. निधना समयी त्या ७० वर्षांच्या होत्या. त्यांच्या पार्थिवावर शुक्रवारी सकाळी ११. ३० वाजता कानसई येथिल वैंकुठभुमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी त्यांच्या अंत्ययात्रेला राजकीय, सामाजिक क्षेत्रातील रायगड जिल्ह्यातुन मोठ्या प्रमाणात जनसमुदाय जमला होता.
कै. मनिषा पवार यांचा अल्पपरीचय द्यायचा झाला तर अतिशय शांत, मनमिळाऊ स्वभाव व त्यांच्यामध्ये भरपुर मेहनत करण्याची ताकद तसेच जिद्द होती. हाॅटेलच्या स्वतः मालकीन असुनसुद्धा त्या कोणत्याही कामात लाज न बाळगता किंवा कोणत्याही प्रकारचा मोठेपणा न करता अगदी मनापासून सर्व कामे करीत असत. येथिल कामगारांना देखिल एक आपुलकीच्या भावनेने वागवत होत्या. परंतु सर्व काही सुरळीत सुरु असतानाच अचानकपणे त्यांच्यावर काळाने घाला घातला. त्यांच्या या अशा अचानक जाण्याने संपूर्ण पवार कुटुंबियांवर व कानसई गावावर दुःख:चे सावट पसरले आहे. कै.पवार यांनी वेळोवेळी आपल्या संपूर्ण कुटुंबाला केलेले बहुमुल्य मार्गदर्शन हे नेहमीच सर्वांच्या लक्षात राहील. त्यांच्या निधनाने संपूर्ण पवार कुटुंबिय पोरके झाले आहे.
कै.पवार यांच्या पश्चात पती मोहन पवार, मुले कैलास पवार व निवास पवार, दोन विवाहित मुली , सुना, जावई, नातवंडे तसेच पवार कुटुंबिय असा मोठा मित्र परिवार आहे. त्यांचे दशक्रिया विधी रविवार दि. २ मार्च तर उत्तरकार्य बुधवार दि. ५ मार्च २०२५ रोजी कानसई येथे होणार असल्याचे पवार कुटुंबियांकडून सांगण्यात आले आहे.