महाराष्ट्र ग्रामीण
स्मार्ट वीज मीटर विरोधातील नागोठणे ग्रामपंचायतीचा ठराव वीज वितरणच्या कार्यालयात सादर

महेश पवार
नागोठणे : वीज वितरण कंपनीने सध्या महाराष्ट्रात सर्वत्र, घरोघरी एका ठराविक व धनाढ्य मालकाच्या कंपनीचे स्मार्ट मिटर लावण्यास सुरुवात केली आहे. या स्मार्ट मिटरमुळे सर्वसामान्य जनतेला आपले जीवन जगणे फार कठीण होईल म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात स्मार्ट मिटर विरोधात मोहीम सुरू आहे. याचाच एक भाग म्हणून नागोठणे ग्रामपंचायत हद्दीत स्मार्ट मिटर कोणाच्याही घरात लागता कामा नये व जेथे जेथे लागले असतील ते काढून टाकण्यात यावेत अशा प्रकारच्या सूचना नागोठणे ग्रामपंचायतीने वीज वितरण कंपनीच्या नागोठणे कार्यालयाला द्याव्यात असा ठराव सामाजिक कार्यकर्ते सगिर अधिकारी यांनी २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त झालेल्या ग्रामसभेत मांडल्यानंतर उपस्थित ग्रामस्थांनी टाळ्या वाजवून अनुमोदन दिले होते. त्यानंतर त्या ठरावाला तात्काळ ग्रामसभेत मंजुरी मिळाली व हा ठराव प्रोसिडींगला घेण्यात आला होता. स्मार्ट वीज मीटर विरोधातील नागोठणे ग्रामपंचायतीचा याच ठरावाची प्रत वीज वितरण कंपनीच्या नागोठणे कार्यालयात सादर करण्यात आली.

यावेळी नागोठणे ग्रामपंचायतीचे उपसरपंच अखलाक पानसरे, जवरुद्दीन सय्यद, अमीन मांडलेकर, हुसेन पठाण, बिलाल मोर्बेकर, नसीम कुवारे, एजाज मोहिने, हानीफ पठाण, अशपाक सुमरा, समीर पानसरे, मेहराज पानसरे, फरदीन कडवेकर आदी ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.