पाटणसई येथिल क्रिकेट स्पर्धेत जय बजरंग वाकण अंतिम विजेता

पाटणसई येथिल क्रिकेट स्पर्धेत जय बजरंग वाकण अंतिम विजेता
दिनेश ठमके
सुकेळी : नागोठणे विभागातील ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेने जय भवानी पाटणसई यांच्या वतीने शनिवार दि. २२ व रविवार दि.२३ फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आलेल्या भव्य अशा क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये जय बजरंग वाकण या संघाने अंतिम सामन्यात विजय संपादन करीत अंतिम विजेतेपद पटकावले. तर काळभैरव या संघास उपविजेत्या पदावर समाधान मानावे लागले.
तसेच तृतिय क्रमांक ओम साई वरवठणे, चतुर्थ क्रमांक जय भवानी पळस व पाचवा क्रमांक जय हनुमान संघ यशस्वी झाला. या सर्व विजेत्या संघांना पारितोषिक देउन गौरविण्यात आले. त्याचप्रमाणे या स्पर्धेमध्ये वैयक्तिक बक्षिसांमध्ये मालिकावीर ठरला तो वाकण संघाचा परवेश माळी, उत्कृष्ट फलंदाज मयुरेश कदम (वाघळी), उत्कृष्ट गोलंदाज ओम भालेकर ( पळस) , सामनावीर परवेश माळी ( वाकण) तर उत्कृष्ट क्षेत्ररक्षक ठरला तो वाकण संघाचा आयुष मोदी. या सर्वांना आकर्षक चषक देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी बक्षिस समारंभाला शिवसेना रोहा उपतालुकाप्रमुख मनोजदादा खांडेकर, रो. पं. समिती माजी सभापती सदानंद गायकर, पाटणसई तंटामुक्ती अध्यक्ष संतोष राणे, ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष विश्वास गायकर, पांडुरंग गायकर, सचिन शेठ कळसकर, महादेव राणे, प्रल्हाद राणे, यश उंबरे, अशोक कोतवाल, राजेंद्र जोशी, विकास म्हात्रे, चंद्रकांत कोतवाल, जितेश राणे विकी सावंत, अरुण कोतवाल, हनुमान राणे, संजय अग्रवाल, शिवराम गायकर आदी उपस्थित होते.