महाराष्ट्र ग्रामीणमहिला विशेष
सुकेळी येथिल बी. सी. जिंदाल रुग्णालयात जागतिक महिला दिन उत्साहात साजरा

सुकेळी येथिल बी. सी. जिंदाल रुग्णालयात जागतिक महिला दिन उत्साहात साजरा
दिनेश ठमके
सुकेळी : जागतिक महिला दिन हा दरवर्षीप्रमाणेच यावर्षीही दि.८ मार्च रोजी सर्वत्र उत्साहात साजरा करण्यात आला. महिला हक्क चळवळीतील केंद्रबिंदू म्हणुन हा दिवस पाळला जात असतांनाच ऐनघर ग्रामपंचायत हद्दीमध्ये असलेल्या बी. सी. जिंदल रुग्णालयात नेहमीच रुग्णांची सेवा करणाऱ्या महिला वर्गांनी जिंदल रुग्णालयात जागतिक महिला दिन अतिशय उत्साहात साजरा केला.
यावेळी सर्व महिला कर्मचाऱ्यांनी मराठमोळ्या पद्धतीने साड्या परिधान करून तसेच केक कापून महिला दिन उत्साहात साजरा केला. तसेच येथिल सर्व पुरुष कर्मचा-यांकडुन सर्व महिला कर्मचाऱ्यांना पुष्पगुच्छ देऊन महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी सर्व महिला कर्मचा-यांसह जिंदाल रुग्णालयातील सर्व कर्मचाऱी उपस्थित होते.