Uncategorizedमहाराष्ट्र ग्रामीण

स्मार्ट मीटर बसवला तर वीज मिळणार स्वस्त !

स्मार्ट मीटर बसवला तर वीज मिळणार स्वस्त !
महावितरण सोबत ग्राहकांना सुद्धा होणार फायदा 
मात्र यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती होणे गरजेचे

अनिल पवार 
नागोठणे : वीज ग्राहकांसाठी बसविण्यात येणारे विजेचे स्मार्ट मीटर हे अचूक बिलिंग, वीज वापराची नियमित माहिती व खर्चावर नियंत्रण ठेवण्याची सुविधा यामुळे वरदान ठरणार आहेत. स्मार्ट मीटरच्या वापरामुळे भविष्यात वीज वापराच्या वेळेनुसार कमी दरात वीज मिळण्याची सुविधाही उपलब्ध करता येणार आहे. तसेच महावितरणच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे की महावितरण कडून लावण्यात येत असलेले मीटर स्मार्ट प्रीपेड मीटर नसून अत्याधुनिक तंत्रज्ञान युक्त स्मार्ट मीटर आहेत. मात्र महावितरणचे हे स्मार्ट मीटर प्रीपेड मीटर असल्याबाबत ग्रामीण भागातील जनसामान्यांत अफवा पसरवून गैरसमज पसरवले जात आहेत. अशावेळी सूज्ञ नागरिकांनी, वीज ग्राहकांनी अफवांवर विश्वास न ठेवता आपले भविष्यातील वीज बिल कमीत कमी येण्यासाठी महावितरण कडून बसविण्यात येणारे स्मार्ट मीटर जे प्रीपेड मीटर नाहीत ते स्विकारावेत तसेच इतर नागरिकांमध्येही यासंदर्भात जागृती करण्याचे आवाहन महावितरणच्या कार्यकारी अभियंता रोहा विभागीय कार्यालयाकडून विभागातील सर्व वीज ग्राहकांना करण्यात आले आहे.

दरम्यान महावितरणच्या रोहा विभागीय कार्यालया अंतर्गत येणाऱ्या काही गावातील स्मार्ट मीटर बसवणे बाबत काही शंका गैरसमज आणि हरकत असल्याचे निदर्शनास आले. यावेळी महावितरणच्या वतीने स्पष्ट करण्यात येते की महावितरण तर्फे लावण्यात येत असलेले मीटर स्मार्ट प्रीपेड मीटर नसून अत्याधुनिक तंत्रज्ञान युक्त स्मार्ट मीटर आहेत प्रीपेड मीटर असल्याबाबत गैरसमज पसरले जात असून असे आपण विश्वास ठेवू नये तसेच स्मार्ट मीटर हा ग्राहकांच्या सोयीसाठी आणि वीज व्यवस्थापन सुधारण्यासाठी एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे त्यामुळे आपणास विनंती करण्यात येते की या सरकारी उपक्रमाला सहकार्य करून गावातील नागरिकांना स्मार्ट मीटर स्वीकारण्यासाठी प्रोत्साहित करावे. स्मार्ट मीटर लावल्यामुळे विविध सदर कमी होण्यास मदत होणार असून त्या दृष्टीने पुढील पाच वर्षाचे वीजदर ठरवण्याचा प्रस्ताव विज नियमक आयोगाकडे महावितरण मार्फत सादर करण्यात आला असून त्यावरील जन सुनावणीस लवकर सुरुवात होत आहे व त्यामध्ये झिरो ते १०० युनिट वीज वापरतात मोठी कापत प्रस्तावित आहे. याचा फायदा वीज ग्राहकांनाच मिळणार असून पैशांची बचत होणार असल्याचेही महावितरण कडून सांगण्यात आले.

स्मार्ट मीटर लावल्यामुळे महावितरण सोबत ग्राहकांना सुद्धा असा होणार फायदा 

वीज ग्राहकास आपला दैनंदिन विज वापर तात्काळ मोबाईल ॲप द्वारे बघता येईल व आपल्या वीज वापराचे नियोजन योग्य रीतीने केल्यास वीज देयकात बचत करता येईल.मीटर रिडींग मध्ये मानवी हस्तक्षे पूर्णपणे बंद झाल्याने प्रत्यक्ष मीटर रिडींग प्रमाणे देयक येईल व चुकीच्या वीज देयकामुळे ग्राहकास होणारा मनस्ताप,आर्थिक भुर्दंड बसणार नाही.
टी ओ डी दर प्रणालीचा लाभ ग्राहकास द्यायचा असल्यास स्मार्ट मीटर लावणे आवश्यक आहे.
प्रीपेडचा पर्याय व खुशीने निवडल्यास सुरक्षा ठेव भरण्याची आवश्यकता राहणार नाही तसेच अचानक जास्त बिल येण्याची शक्यता नाही. वापरा नुसार वीज ग्राहकांना विचार करता येईल. स्मार्ट मीटरमुळे योग्य वीज वापरायचे देयके त्वरित उपलब्ध करून उपलब्ध झाल्यास ग्राहकांतर्फे ती मुदतीत भरली जातील व त्यामुळे महावितरण कंपनीच्या महसुलात वाढ होऊन सर्वसामान्य ग्राहकास वीजदर कमी करून देता येऊ शकते तसेच वीज बिल वसुलीचा कर्मचाऱ्यांवरील ताण कमी होऊन वीज वाहक वाहिनीची योग्य देखबल करण्यास कर्मचाऱ्यांना पुरेसा वेळ उपलब्ध होईल व त्यामुळे वीज बंद पडण्याचे प्रमाण कमी होऊन अखंडित वीजपुरवठा होण्यास मदत होईल.
आजपर्यंत बऱ्याच ग्राहकांना नवीन तंत्रज्ञान असलेले मीटर्स लावण्यात आले असून त्याबाबत कोणतीही तक्रार नसून सदरचे ग्राहक समाधानी असल्याचेही महावितरण कडून सांगण्यात आले आहे.

 

नादुरुस्त मीटरमुळे सर्व सामान्य वीज ग्राहकांनाच मनस्ताप 

नादुरुस्त मीटर चे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहेत कारण जुने तंत्रज्ञान असलेल्या मीटरचा पुरवठा कमी झाला आहे. नादुरुस्त मीटर बदलणे आवश्यक असून ती बदलण्यासाठी नवीन तंत्रज्ञान असलेली स्मार्ट मीटर वापरून बदलण्या व्यतिरिक्त पर्याय नाही. अन्यथा भरपूर ग्राहकांना नादुरुस्त मीटर मुले आवाजावी वीज देखे येऊन यामुळे सर्व सामान्य वीज ग्राहकांनाच मनस्ताप आर्थिक भुर्दंड सोसावा लागतो. सदरची नादुरुस्ती मीटर बदलण्यास त्या ग्राहकांना प्रीपेड मीटर न लावता पोस्ट मीटर लावण्यात येत आहेत. नादुरुस्ती मीटर पोस्टपेड द्वारे बदलण्याची मोहीम चालू असून त्याकरिता सर्वानी महावितरणला सहकार्य केले पाहिजे. स्मार्ट मीटर वापरणे सर्वसामान्य ग्राहकास लाभावी होत असल्याने गैरसमजूतीतून स्मार्ट मीटरला असलेला विरोध, नाराजी दूर करावी व स्मार्ट मीटर लावणे बाबत महावितरण कंपनी सहकार्य करावे. तसेच स्मार्ट मीटर म्हणजे प्रीपेड मीटर नाही हे येथे आवर्जून नमूद करण्यात येत असून संपूर्ण महाराष्ट्र मध्ये स्मार्ट मीटर लावण्याचे काम सुरू आहे. ही सुविधा ग्राहकांच्या हिताचीच आहे; त्यामुळे सर्व वीज ग्राहकांनी या उपक्रमात विरोध न करता ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये जागृती करावी व त्यांना सहकार्य करण्यास प्रवृत्त करणे गरजेचे आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!