महाराष्ट्र ग्रामीण

आगामी सण-उत्सव गालबोट न लावता साजरे करा – सपोनि सचिन कुलकर्णी

बदललेल्या कायद्या बद्दल केले बहुमोल मार्गदर्शन 

आगामी सण-उत्सव गालबोट न लावता साजरे करा – सपोनि सचिन कुलकर्णी

बदललेल्या कायद्या बद्दल केले बहुमोल मार्गदर्शन 

महेश पवार 

नागोठणे : नागोठणे शहर व विभागातील सर्व समाज बांधवांनी एकोप्याने राहत कोणतेही गालबोट न लागता यापूर्वी जसे सगळेच सण शांततेत व  आनंदाने आणि तितक्याच उत्साहाने साजरे केलेत त्याच पार्श्वभूमीवर आपण सर्व धर्मीय शेवटी नागोठणेकरच आहोत याची जाणीव ठेवून, एकमेकांना सहकार्य करून, एकमेकांच्या सणांमध्ये व धार्मिक कार्यात सहभागी होऊन आगामी सण-उत्सव गालबोट न लावता आनंदाने साजरे करा असे आवाहन नागोठण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन कुलकर्णी यांनी केले.

आगामी काळात येणारे गुढीपाडवा, रमजान ईद या सणांच्या अनुषंगाने नागोठणे पोलीस ठाणे हद्दीतील शांतता कमिटी सदस्य, पत्रकार, व्यापारी असोसिएशन सदस्य यांची सयुक्तीक शांतता समितीची बैठक दिनांक २५ मार्च रोजी सायंकाळी संपन्न झाली त्यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सपोनि सचिन कुलकर्णी यांनी सांगितले की, इतर बाबतीत आमचे सर्वांनाच सहकार्य राहील मात्र सोशल मिडियावर आक्षेपार्ह पोस्ट न टाकणे, एखाद्याचे मन दुखावेल अशी पोस्ट न टाकणे, बदललेले कायदे व सायबर क्राईम मधील नवीन कायद्यांनुसार होणारे मोठे दंड आणि आपल्या परिसरातील नागरिक कोणत्याही गुन्ह्यात अडकू नये यासाठी बहुमोल असे मार्गदर्शनही सचिन कुलकर्णी यांनी केले.

या बैठकीला सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन कुलकर्णी यांच्यासह पोलिस कर्मचारी स्वप्नील भालेराव, हिरामण कोकाटे, किशोरभाई म्हात्रे, आसिफ मुल्ला, प्रकाश तांबोळी, श्रीधर गदमळे, हुसेन पठाण, मुजफ्फर कडवेकर, अयाज पानसरे, असगर सय्यद, अजताब कुरेशी, हानिफ पठाण, बाबा मुल्ला आदींसह इतर नागरिक यावेळी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!