बाळसई येथे आज श्री.बेलजाई मातेच्या वर्धापन दिन सोहळ्याचे आयोजन

बाळसई येथे बुधवारी श्री.बेलजाई मातेच्या वर्धापन दिन सोहळ्याचे आयोजन
दिनेश ठमके
सुकेळी : रोहा तालुक्यातील नागोठणे जवळच असलेल्या श्री. क्षेत्र बाळसई येथे बुधवार दि. २ एप्रिल २०२५ रोजी श्री.बेलजाई मातेच्या ११ व्या वर्धापनदिन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्याच्या निमित्ताने विविध कार्यक्रम संपन्न होणार आहेत.
कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ८ ते दुपारी १ या वेळेमध्ये श्री.बेलजाई मातेच्या मर्तीवर दुग्ध अभिषेक व होम हवन करुन करण्यात येणार आहे. . त्यानंतर दुपारी १ वाजता उपस्थित भाविकांना महाप्रसाद देण्यात येईल. सायंकाळी ४ वाजता संपूर्ण बाळसई गावातुन श्री. बेलजाई मातेच्या पादुका दर्शन पालखी मिरवणूक सोहळा पार पडल्यानंतर सायंकाळी ७ वाजता वारकरी भजन मंडळ, महिला मंडळ बाळसई यांचा हरिपाठ व रात्री ८ वाजता पुन्हा उपस्थित भाविकांना महाप्रसाद देण्यात येईल. शेवटी रात्री १० वाजता नागोठणे मित्र मंडळ यांच्या संगीत भजनाने या कार्यक्रमाची सांगता होणार आहे.हा वर्धापनदिन सोहळा यशस्वी करण्यासाठी बाळसई गावचे अध्यक्ष मधुकर ठमके यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामस्थ मंडळ, महिला मंडळ, बेलजाई मित्र मंडळ मुंबई, बेलजाई क्रिडा मंडळ बाळसई मेहनत घेत आहेत.