धार्मिक सोहळामहाराष्ट्र ग्रामीण
श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट दिन व पालखी सोहळा नागोठण्यात भक्तिमय वातावरणात साजरा
श्री स्वामी समर्थ नामघोषाने दुमदुमली नागोठणे नगरी

श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट दिन व पालखी सोहळा नागोठण्यात भक्तिमय वातावरणात साजरा
श्री स्वामी समर्थ नामघोषाने दुमदुमली नागोठणे नगरी
महेश पवार
नागोठणे : श्री क्षेत्र अक्कलकोट निवासी राजाधिराज, योगिराज श्री स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त सोमवार दि. ३१ मार्च रोजी नागोठणे येथील खडकआळी येथील श्री स्वामी समर्थ आध्यात्मिक विकास केंद्रात

खडकआळी ग्रामस्थ तसेच नागोठणे शहर व परिसरातील स्वामी भक्तांनी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करुन श्री स्वामी समर्थ प्रकट दिन भक्तिमय वातावरणात आनंदाने साजरा करण्यात आला. या पालखी सोहळ्यात सर्वत्रच श्री स्वामी समर्थ नामघोषाने नागोठणे नगरी दुमदुमल्याचे पहावयास मिळाले.

श्री स्वामी समर्थ प्रकट दिनानिमित्त श्री स्वामी समर्थ आध्यात्मिक विकास केंद्र, खडक आळी नागोठणे येथे सकाळपासून विविध धार्मिक कार्यक्रम झाल्यानंतर दुपारी ३ वाजता श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट दिन सोहळ्यानिमित्त खडक आळीतील श्री स्वामी समर्थ आध्यात्मिक विकास केंद्रातून श्री स्वामी समर्थांच्या पालखी सोहळ्यास प्रारंभ झाला. हा पालखी सोहळा शांतीनगर भागातून नंतर हायवे नाका, छत्रपती शिवाजी महाराज चौक, बाजारपेठ, पोलीस स्टेशन नंतर ग्रामपंचायत कार्यालय, ग्रामदेवता श्री जोगेश्वरी माता मंदिर परिसराकडून आंगरआळी भागातून खडकआळी मार्गे पुन्हा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मठात पालखी आल्यानंतर या पालखी सोहळ्याची सांगता झाली. यावेळी श्री स्वामी समर्थ मठात आरती घेण्यात आली.

तदनंतर रात्री सर्व उपस्थित ग्रामस्थांनी तसेच स्वामी भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतल्यानंतर श्री स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त आयोजित उत्सवाची सांगता झाली. नागोठणे खडकआळी येथील श्री स्वामी समर्थ आध्यात्मिक विकास केंद्रात आयोजित श्री स्वामी समर्थ प्रकटदिन सोहळा तसेच प्रकट दिनानिमित्त आयोजित पालखी सोहळा निर्विघ्नपणे यशस्वीरीत्या संपन्न होण्यासाठी ग्रामस्थ नागोठणे, ज्वाला ग्रुप खडक आळी, बाजारपेठ विभाग व स्वामी सेवक भक्तगण, खडकआळी ग्रामस्थ व नागोठणे शहर व परिसरातील स्वामी भक्तांनी विशेष मेहनत घेतली.