महाराष्ट्र ग्रामीणशैक्षणिक
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने नागोठणे कन्याशाळेत कार्यक्रम
मोरेश्वर सगने यांच्याकडून सतरंज्या व समई भेट

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने नागोठणे कन्याशाळेत कार्यक्रम
मोरेश्वर सगने यांच्याकडून सतरंज्या व समई भेट
सामाजिक कार्यकर्ते मोरेश्वर सगने यांच्या कार्याचे कौतुक
महेश पवार
नागोठणे : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती राजिपच्या नागोठण्यातील कन्या शाळेत व केंद्रीय शाळेत नुकतीच उत्साहात व विविध स्तुत्य कार्यक्रमांनी साजरी करण्यात आली. यावेळी डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून येथील सामाजिक कार्यकर्ते मोरेश्वर सगने यांनी रायगड जिल्हा परिषदेच्या नागोठण्यातील कन्या शाळेला आणि केंद्रीय शाळेला सतरंज्या आणि समई या वस्तू भेट स्वरूपात दिल्या.

कन्या शाळा व केंद्रीय शाळेत संपन्न झालेल्या या छोटेखानी कार्यक्रमाला सामाजिक कार्यकर्ते मनोजदादा टके, नागोठणे ग्रामपंचायतीचे सदस्य प्रकाश कांबळे, केंद्र प्रमुख मुदगुल, मोरेश्वर सगने शाळेच्या मुख्याध्यापिका विजया धनवडे, कृती पडवळ, मुख्याध्यापिका समा शेळके, ज्योती सैदाने तसेच विद्यार्थी व विद्यार्थिनी होते.
कार्यक्रमाच्या सुरूवातीला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला मनोजदादा टके यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून उपस्थितांनी बाबासाहेबांना अभिवादन केले. तसेच शाळेच्या शिक्षिका यांनी मोरेश्वर सगने हे आमच्या शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य होते आणि त्यांची मुलगी आमच्या शाळेत शिकत असताना त्यांनी वेळोवेळी शाळेला सहकार्य केले असल्याचे सांगितले. त्यांनी शाळेत मुलींना बसण्यासाठी सतरंज्या आणि शाळेत कार्यक्रमांसाठी मोठी समई या वस्तू भेट म्हणून दिल्याबद्दल आभार मानले. तसेच ग्रामपंचायत सदस्य प्रकाश कांबळे यांनी आपल्या मनोगतात मोरेश्वर सगने यांनी एक स्तुत्य असा उपक्रम आज केला आणि ते समाजात सामाजिक बांधिलकी म्हणून आपले योगदान देत असतात आणि हा मानस आणि योगदान समाजपयोगी असून भविष्यात याचा आदर्श अनेक पालक आणि आजी माजी विद्यार्थी घेतील असा विश्वास व्यक्त केला.