धार्मिक सोहळामहाराष्ट्र ग्रामीण

नागोठण्यात श्री संत शिरोमणी गोरोबा काका यांचा पुण्यतिथी सोहळा भक्तीमय वातावरणात संपन्न 

नागोठण्यात श्री संत शिरोमणी गोरोबा काका यांचा पुण्यतिथी सोहळा भक्तीमय वातावरणात संपन्न 
अनिल पवार
नागोठणे : नागोठण्यातील कुंभारआळी येथील श्री गणपती – हनुमान मंदिरात कुंभार समाजाचे आराध्य दैवत श्री संत शिरोमणी गोरोबा काका यांचा पुण्यतिथी सोहळा श्री संत अलिबागकर महाराज यांच्या आशीर्वादाने दरवर्षी प्रमाणे यावर्षीही शनिवार दि. २६ एप्रिल रोजी कुंभार समाज बांधवांकडून विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करुन मोठ्या उत्साहात भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला.
नागोठणे कुंभारआळी येथील श्री गणपती – हनुमान मंदिरात कुंभार समाजाच्या वतीने आयोजित श्री संत शिरोमणी गोरोबा काका यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित या सोहळ्यास राष्ट्रवादी काँग्रेसचे विभागीय नेते मा. जिल्हा परिषद सदस्य नरेंद्र जैन, शिवसेना (उबाठा) नेते रायगड जिल्हा सहसंपर्कप्रमुख मा.जिल्हा परिषद सदस्य किशोरभाई जैन, भाईसाहेब टके, नागोठणे सरपंच सुप्रिया संजय महाडिक, नागोठणे पोलीस ठाण्याचे सहा.पोलीस निरीक्षक सचिन कुलकर्णी, ग्रामपंचायत सदस्य ज्ञानेश्वर साळुंखे, संतोष नागोठणेकर सदस्या पुनम इप्ते, अमृता महाडिक,शहनाज अधिकारी,शबाना मुल्ला, ज्योती राऊत, यांच्यासह नागोठणे शहर व परिसरातील मान्यवरांनी भेट देऊन मनोभावे दर्शन घेतले.
दरम्यान श्री संत गोरोबा काका पुण्यतिथी सोहळ्याची सुरुवात शनिवारी (दि.२६) पहाटे ५ वा. उन्नती महिला मंडळ व ग्रामस्थ मंडळ कुंभारआळी यांच्याकडून काकड आरतीने झाली. तद्नंतर सकाळी ८ ते ९ वाजण्याच्या दरम्यान कुंभार आळी ग्रामस्थांकडून श्री गणपती – हनुमान मंदिरात कळस स्थापना करण्यात आली.यानंतर श्री संत गोरोबा काका पुण्यतिथी सोहळ्याच्या निमित्ताने सकाळी ९ वा. दिंडी सोहळा आयोजीत करण्यात आला होता. यावेळी संत महंतांच्या विविध वेशभूषा व वस्त्रे अलंकार परिधान केलेल्या लहानग्यांसह समाज बांधवांनी मोठ्या संख्येने या दिंडीत सहभाग घेतला होता.
श्री संत गोरोबा काका पुण्यतिथी निमित्त आयोजित नागोठणे संत सेवा मंडळाचे भजन संपन्न झाल्यानंतर दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास संत गोरोबा काका यांच्या मूर्तीवर पुण्यतिथी निमित्त पुष्पवृष्टी करण्यात आली. याचबरोबर संत गोरोबा काका यांच्या पुण्यतिथीनिमित्त कुंभारआळी ग्रामस्थांच्या वतीने दुपारी ३ वाजता श्री सत्यनारायणाच्या महापूजा संपन्न झाली.त्यानंतर सायंकाळी ५ ते ६ वा. गायक प्रफुल्ल नागोठणेकर व तबलजी कौस्तुभ दिवेकर व सहकाऱ्यांचे श्री स्वामी समर्थ प्रासादिक भजन मंडळ, नागोठणे यांचे सुमधुर संगीत भजन संपन्न झाले. तर सायं. ६ ते ७ वा. यावेळेत वरप (ता.पेण) येथील ह.भ.प. भगवान कदम यांच्या नेतृत्वाखाली श्री दत्तसेवा हरिपाठ मंडळाचे हरिपाठ झाले. तदनंतर रात्री ८ वा. ग्रामस्थ मंडळ कुंभारआळी यांच्या वतीने  ठेवण्यात आलेल्या महाप्रसादाचा सर्व उपस्थित भाविकांनी लाभ घेतला.शेवटी रात्री १० वा. राजिपचे सेवानिवृत्त उपमुख्य कार्यकारी अधिकारी शरद वाडेकर यांच्या माध्यमातून खोपोली येथील किर्तनकार ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज शिंदे यांच्या सुश्राव्य किर्तन संपन्न झाले. श्री संत शिरोमणी गोरोबा काका यांचा पुण्यतिथी सोहळा यशस्वी संपन्न  होण्यासाठी सर्व ग्रामस्थ मंडळ व उन्नती महिला मंडळ कुंभारआळी नागोठणे यांनी विशेष मेहनत घेतली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!