महाराष्ट्र ग्रामीणशैक्षणिक

पदवीधर शिक्षक कुंदन जाधव राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित

पदवीधर शिक्षक कुंदन जाधव राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित     

नंदकुमार मरवडे 
खांब : रोहा तालुक्यातील रायगड  जिल्हा परिषद शाळा वांगणी पदवीधर शिक्षक कुंदन धोंडू जाधव यांनी शैक्षणिक, सामाजिक,  आध्यात्मिक  क्षेत्रात केलेल्या बहुमोल योगदानाबद्दल, उल्लेखनीय शैक्षणिक कार्याबद्दल सन २०२४/२०२५ चा राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे.
रविंद्र भवन सांखळी, गोवा येथे राष्ट्रीय पुरस्कार वितरण समिती, बेळगावी तर्फे २७ एप्रिल २०२५ रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत सन्मानपत्र व सन्मानचिन्ह  देऊन कुंदन जाधव यांना  सन्मानित करण्यात आले.  हा पुरस्कार दिल्ली, कर्नाटक, महाराष्ट्र, गुजरात, गोवा या राज्यातील उत्कृष्ट काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना देण्यात येतो.  कुंदन जाधव यांच्या शैक्षणिक सेवेची सुरुवात ३१ ऑक्टोबर, १९९६ रोजी झाली. त्यांची शैक्षणिक पात्रता एम. ए. बी.एड व एम.एड समकक्ष असलेली एम. ए. एज्युकेशन ही शैक्षणिक पात्रता त्यांनी प्राप्त केलेली आहे.
त्यांनी सुधागड तालुक्यातील चव्हाणवाडी, कडापे ठाकूरवाडी, कोशिंबळे, रोहा तालुक्यातील ढोकळेवाडी, येरळ विठ्ठलवाडी, चिंचवली तर्फे आतोणे व सध्या कार्यरत असलेले वांगणी या शाळांवर उत्कृष्ट शैक्षणिक कामगिरी केली आहे. या पुरस्काराबद्दल रायगड जिल्हा शिक्षणाधिकारी (प्राथमिक) पुनिता गुरव,  गटशिक्षणाधिकारी रोहा मेघना धायगुडे, सर्व शिक्षक संघटना पदाधिकारी, केंद्रप्रमुख रंजना पाटील, सरपंच व सर्व सदस्य ग्रुप ग्रामपंचायत वांगणी, शाळा व्यवस्थापन समिती वांगणीचे अध्यक्षा सपना तेलंगे व सर्व सदस्य, ग्रामस्थ मंडळ वांगणी व शिक्षक वृंद, पालक वर्ग, ग्रामस्थ मंडळ म्हस्करवाडी, सर्व मित्र परिवार व विद्यार्थी वर्ग यांच्याकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!