गुन्हेगारी वृत्तमहाराष्ट्र ग्रामीण

शिहू येथील महिला तीन महिन्यांपासून बेपत्ता

शिहू येथील महिला तीन महिन्यांपासून बेपत्ता

नागोठणे : नागोठण्याजवळील शिहू (ता.पेण) येथील सुवर्णा नथुराम मोकल (वय ४०) ही महिला १५ फेब्रुवारी, २०२५ पासून बेपत्ता झाली आहे. नागोठण्यातील कोकणे हॉस्पिटल मध्ये कामाला जाते असे सांगून सकाळी घरातून बाहेर पडलेली ही महिला अद्याप घरी परत आली नसल्याने या महिलेचे पती नथुराम मोकल यांनी दिलेल्या तक्रारीनुसार नागोठणे पोलिस ठाण्यात मनुष्य मिसिंग राजि. नं.  ६/२०२५ अन्वये सदर महिला हरविल्याच्या घटनेची नोंद करण्यात आली आहे.
या महिलेचे वर्णनामध्ये सदर महिलेचा रंग सावळा, चेहरा उभट, मध्यम बांधा, उंची ४ फूट २ इंच, गळ्यात सोन्याची एक डावली असलेले काळे मंगळसूत्र, अंगात पिवळ्या रंगाचा टॉप व सफेद रंगाची लेगीज, पायात चप्पल आहे. अशा वर्णनाची महिला कुणाला आढळल्यास नागोठणे पोलिस ठाण्यात महिला पोलिस हेड कॉ. संजिता सानप यांच्याशी मो. क्र. ९८८१४२०५१५ यावर संपर्क साधण्यास सांगण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!