महाराष्ट्र ग्रामीणशैक्षणिक
वांगणी हायस्कूलच्या १९९९ बॅचच्या विद्यार्थ्यांचा गेट – टुगेदर उत्साहात साजरा

वांगणी हायस्कूलच्या १९९९ बॅचच्या विद्यार्थ्यांचा गेट – टुगेदर उत्साहात साजरा
दिनेश ठमके
सुकेळी : सुधागड एज्युकेशन सोसायटीच्या नागोठण्याजवळील बाळसई येथील
माध्यमिक विद्यालय वांगणी मधील सन १९९९ च्या बॅचच्या विद्यार्थ्यांचा गेट टुगेदर नुकताच पाली जवळील उन्हेरे येथील हिडन हिल व्हीला रिसाॅर्ट या ठिकाणी मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी वांगणी हायस्कूल मधील सर्वांचे आवडते शिक्षक विकास म्हात्रे यांच्यासह १८ विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच प्रत्येकांनी आपआपले मनोगत व्यक्त करतांना स्वतःची कौंटुबिक माहिती देत सर्वांनीच शाळेतील जुन्या आठवणींना उजाळा देत सध्याच्या परिस्थितीत सुरु असलेल्या आपल्या जीवनातील माहीती दिली. तसेच यावेळी विविध प्रकारचे खेळ, तर काही जणांनी गाणी म्हणत पोहण्याबरोबर नाचण्याचाही आनंद लुटला. तब्बल २७ वर्षांनी एकत्र भेटल्याने सर्वांच्याच चेह-यावर तो शालेय जीवनाचा आनंद ओसंडून वाहतांना दिसत होता.
काही वेळानी सर्वांनी गप्पा मारत जेवणाचा आनंद लुटला. त्यानंतर सर्व मुलांनी या गेट टुगेदरला उपस्थित असलेल्या सर्व मुलींना गणेश मूर्ती भेट दिली. तसेच शिक्षक विकास म्हात्रे यांना देखील यावेळी छोटीशी भेटवस्तू देण्यात आली. शेवटी कार्यक्रमाची सांगता करतांना प्रत्येकाचे डोळे पाणावले होते. कारण येवढ्या वर्षांनंतर एकत्र येत पुन्हा जो तो आपापल्या घरी मार्गस्थ होणार होता. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्वांनीच अपार मेहनत घेतली.