महाराष्ट्र ग्रामीणवाहतूक

अवजड वाहनांना धरमतर ब्रिज ते अलिबाग तसेच अलिबाग ते मांडवा जेट्टी व अलिबाग-रेवदंडा-मुरूड मार्गावर बंदी 

बंदी झुगारणाऱ्या अवजड वाहनांवर होणार कारवाई 

अवजड वाहनांना धरमतर ब्रिज ते अलिबाग तसेच अलिबाग ते मांडवा जेट्टी व अलिबाग-रेवदंडा-मुरूड मार्गावर बंदी 

बंदी झुगारणाऱ्या अवजड वाहनांवर होणार कारवाई 

महेश पवार

नागोठणे : सध्या मुलांना उन्हाळी सुट्ट्या असल्याने तसेच नोकरदार आईवडिलांना शनिवार व रविवार हे सुट्ट्यांचे दिवस येत असल्याने जिल्ह्यात पर्यटक दाखल होत असून वाहनाची गर्दी वाढत आहे. त्यामुळे मे महिन्यातील तिसऱ्या आठवड्यातील १७ व १८ मे तसेच चौथ्या आठवड्यातील २४ व २५ मे या दोन्ही दिवशी शनिवार व रविवार हे सुट्ट्यांचे दिवस असल्याने होणारी गर्दी पाहता तसेच स्थानिक नागरिक व पर्यटक यांचा प्रवास सुखकर होण्याच्या दृष्टिकोनातून तसेच अपघातांचे प्रमाण कमी व्हावे यासाठी १७ व १८ मे तसेच २४ व २५ मे या दोन्ही दिवशी वाढत्या वाहनांमुळे जिल्ह्यात वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात जिल्हा प्रशासनाने अवजड वाहनांना बंदी केली आहे. बंदी झुगारणाऱ्या अवजड वाहनांवर वाहतूक पोलिसांकडून होणाऱ्या कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.

दिनांक १७ व १८ मे तसेच दिनांक २४ व २५ मे रोजी सकाळी ८ ते रात्री १० या वेळेत राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६६ -अ वर धरमतर ब्रिज ते अलिबाग तसेच अलिबाग ते मांडवा जेट्टी व अलिबाग-रेवदंडा-मुरूड या राज्यमार्गावरील जिवनावश्यक वस्तु (दूध, पेट्रोल, डिझेल, स्वयंपाकाचा गॅस, औषधे, ऑक्सिजन, भाजीपाला इत्यादी) वगळून जड-अवजड वाहनांची वाहतुक बंदी करण्यात आली आहे.

रायगड जिल्हा हा पर्यटन जिल्हा असल्याकारणाने आणि मे महिन्यात मुलांना शाळेला सुट्टी असल्याने पर्यटक हे मांडवा, किहीम अलिबाग, आक्षी, नागाव, रेवदंडा, काशिद, मुरूड, दिवेआगर, श्रीवर्धन, महाड अशा पर्यटन स्थळी मोठ्या प्रमाणात आपआपली वाहने घेवून येत असतात. सध्या मे महिन्याच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना सुट्टी असल्याकारणाने पर्यटक हे रायगड जिल्ह्यामध्ये फिरण्याकरीता वेगवेगळ्या समुद्र किनार्‍यावरील बीचला भेटी देत असतात. त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्ग तसेच शहरामध्ये पर्यटकांची मोठ्या प्रमाणात रेलचेल असून त्यातच महामार्गावरील जड-अवजड वाहनांमुळे वाहतूक कोंडी होत आहे. वडखळ-अलिबाग हा रस्ता एकेरी रस्ता आहे. तसेच अलिबाग-रेवस व अलिबाग-रेवदंडा-मुरूड हे रस्ते अरूंद आहेत.

पर्यटकांची प्रचंड प्रमाणात येणारी व जाणारी वाहने व त्याच वेळी रोडवरून होणारी डंपर, ट्रक व इतर जड-अवजड वाहनांची वाहतूक कोंडी होण्याची तसेच अपघात होण्याची दाट शक्यता आहे. १७ व १८ मे तसेच २४ व २५ मे रोजी शनिवार व रविवार रोजी सार्वजनिक सुट्टी असल्याने पर्यटक हे मोठ्या प्रमाणात येणार आहेत. वाहतूक कोंडीमुळे पर्यटक व नागरीकांना मानसिक त्रास सहन करावा लागू नये व सध्या घडत असलेले अपघात पाहता, अपघाताचे प्रमाण कमी होण्याच्या दृष्टीकोणातून उपाययोजना म्हणून तसेच पर्यटक व नागरीकांचा प्रवास सुखरूप व्हावा याकरीता राष्ट्रीय महामार्ग कमांक १६६-अ वर धरमतर ब्रिज ते अलिबाग तसेच अलिबाग ते मांडवा जेट्टी व अलिबाग-रेवदंडा-मुरूड या राज्यमार्गावरील जिवनावश्यक वस्तु वगळून जड अवजड वाहतुक बंदी राहणार असल्याचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी जाहीर केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!