अपघातमहाराष्ट्र ग्रामीण

जिंदाल कॉलनीच्या आवारात शॉक लागल्याने मुलाचा मृत्यू 

अपघातास जबाबदार असणाऱ्यांवर कारवाईची मागणी 

जिंदाल कॉलनीच्या आवारात शॉक लागल्याने मुलाचा मृत्यू 

अपघातास जबाबदार असणाऱ्यांवर कारवाईची मागणी 
महेश पवार 
नागोठणे : नागोठण्याजवळील सुकेळी येथील जिंदाल हॉस्पिटल लगत असलेल्या जिंदाल कंपनीच्या हॉस्पिटल कॉलनीच्या आवारात खेळत असलेल्या मुलाला विजेच्या खांबाला शॉक लागून त्या मुलाचा दुर्दैवीपणे मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना बुधवार दिनांक ११ जून रोजी सायंकाळी ५.३० वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या दुर्दैवी घटनेत मानव कुमार मुकेश पवार (वय १३ वर्षे), मूळ रा. फतेहपूर (राजस्थान) सध्या रा. जिंदाल हॉस्पिटल कॉलनी, सुकेळी या मुलाचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे जिंदाल हॉस्पीटल कॉलनी मध्ये व सुकेळी परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
यासंदर्भात नागोठणे पोलीस ठाण्यातून उपलब्ध झालेल्या माहितीनुसार हा १३ वर्षीय मुलगा जिंदाल हॉस्पिटल कॉलनीच्या बाहेर असलेल्या मैदानात कॉलनीतील इतर मुलांसोबत खेळत असताना या मैदानालगत असलेल्या पथदिव्याच्या विजेच्या  खांबाला त्याचा स्पर्श झाल्याने त्याला मोठा शॉक लागला. त्यानंतर या मुलाला लगेचच रोहा येथील डॉ. जाधव नर्सिंग होम या हॉस्पिटलमध्ये पुढील उपचारासाठी नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले. या घटनेची नोंद नागोठणे पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यू अशी करण्यात आली असून पुढील तपास नागोठणे पोलिस ठाण्याचे सपोनि सचिन कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली नागोठणे पोलिस करीत आहेत.
ही दुर्दैवी घटना जिंदाल माऊंट लिटेरा झी स्कूलच्या मागील बाजूस असणाऱ्या खेळाच्या मैदाना लगत घडली असल्याने या दुर्दैवी घटनेस जबाबदार असलेल्या जिंदाल स्कूलच्या व्यवस्थापनासह  जिंदाल कंपनीच्या इलेक्ट्रिक विभागातील संबंधित दोषी व्यक्तींवर कडक कारवाई करावी अशी मागणी नागरिकांतून व पालक वर्गातील करण्यात येत आहे. 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!