महाराष्ट्र ग्रामीणशैक्षणिक

कोएसोच्या नागोठण्यातील प्राथमिक शाळेत विद्यार्थी व पालकांचे स्वागत 

विद्यार्थ्यांना सरकारी पाठ्यपुस्तकांचेही केले वाटप 

कोएसोच्या नागोठण्यातील प्राथमिक शाळेत विद्यार्थी व पालकांचे स्वागत 

विद्यार्थ्यांना सरकारी पाठ्यपुस्तकांचेही केले वाटप 
महेश पवार 
नागोठणे : कोकण एज्युकेशन सोसायटीच्या नागोठण्यातील बापूसाहेब देशपांडे विद्यासंकुलातील अमरचंद जेठमल जैन प्राथमिक शाळेत आज शाळेच्या पहिल्याच दिवशी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थी व पालकांचे औक्षण करून आणि  गुलाब पुष्प देवून सहर्ष स्वागत करण्यात आले.
यावेळी को.ए.सो.प्राथमिक शाळा समितीचे अध्यक्ष अनिल काळे, सदस्य सुभाष जैन, सदस्य
जयराम पवार, प्रभारी मुख्याध्यापिका अनघा लोखंडे, शिक्षिका राजश्री शेवाळे, विजया पिंगळे, राहुल भवर,
पहिली ते चौथीचे विद्यार्थी व पालक वर्ग यावेळी  मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले. नंतर शाळा समिती अध्यक्ष व सदस्य यांचे हस्ते इयत्ता पहिली ते चौथीच्या वर्गातील सर्व विद्यार्थ्यांना सरकारी पाठ्यपुस्तके वाटप करण्यात आली. कोएसोच्या बापूसाहेब देशपांडे विद्यासंकुलतील अमरचंद जेठमल जैन प्राथमिक शाळेत दरवर्षी हा स्तुत्य उपक्रम राबविण्यात येत असल्याने स्थानिक शाळा समिती व शिक्षकांचे सर्वत्र कौतुक होत आहे. 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!