आरोग्यखेळमहाराष्ट्र ग्रामीण
श्रीमती शांतीबाई ओटरमल जैन आयुर्वेदिक मेडिकल कॉलेजमध्ये अंतराष्ट्रीय योग दिन साजरा
विद्यार्थी, प्राध्यापक व पोलिसांचा सहभाग

श्रीमती शांतीबाई ओटरमल जैन आयुर्वेदिक मेडिकल कॉलेजमध्ये अंतराष्ट्रीय योग दिन साजरा
विद्यार्थी, प्राध्यापक व पोलिसांचा सहभाग
महेश पवार
नागोठणे : श्रीमती शांतीबाई ओटरमल जैन आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज व रुग्णालय, वेलशेत येथे ११ व्या जागतिक योग दिनाचे औचित्य साधून दि.१६ ते २१ जून दरम्यान ‘योग सप्ताह’ आयोजित करण्यात आला. या अंतर्गत विविध कार्यक्रम घेण्यात आले. या योग दिनाचा समारोप शनिवार दिनांक २१ जून रोजी सकाळी मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला.

या सप्ताहाची सुरुवात ‘योग वर्कशॉप’ ने झाली. याद्वारे विद्यार्थ्यांमध्ये योगाबद्दल जागृती निर्माण करण्यासाठी ‘एक पृथ्वी, एक स्वास्थासाठी योग ‘ या धरतीवर व्याख्यान आयोजित करण्यात आले. माननीय प्राचार्या डॉ. ज्योती जगताप यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. योग सप्ताहामध्ये ‘योगा चॅलेंज’, ‘ ग्रुप स्लोगन कॉम्पिटिशन’ त्याचबरोबर सामान्य लोकांमध्ये योगा बद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी ‘योग अवेअरनेस’ रॅली काढण्यात आली. २० जून शुक्रवार रोजी योग सरावाचे सत्र पार पडले. ११ वा जागतिक योग दिन, शनिवार रोजी सकाळी ‘योग संगम’ हा कार्यक्रम पार पडला. यामध्ये कॉलेजच्या प्राचार्य, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, रुग्णालयीन कर्मचारी, व विद्यार्थी आणि रुग्ण यांचा सहभाग होता.

कार्यक्रमाची सुरुवात योग गीताने करून आयुष्य विभागाच्या सामान्य योग अभ्यासक्रमानुसार वेगवेगळी आसने करण्यात आली. या कार्यक्रमास नागोठणे पोलीस ठाण्याच्या वतीने हे. कॉ. महेश लांगी व बळी पुठ्ठेवाड यांची उपस्थिती लाभली. योग अभ्यासानंतर प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते बक्षिस वितरण समारंभ पार पडला. ‘योग चॅलेंज’ या स्पर्धेमध्ये कु. प्रेरणा देवरूखकर हिने प्रथम व कु. शंतनु पवार याने द्वितीय क्रमांक पटकावला. ‘ग्रुप स्लोगन कॉम्पिटिशन’ स्पर्धेअंतर्गत २ विजेते गट काढण्यात आले. प्रथम क्रमांक आलेल्या गटामध्ये कु. प्रेरणा शेडगे, कु. श्रावणी शेलार, कु. Iतन्वी विशे, कु. वैष्णवी हेंद्रे, व कु. जितेंद्र उपाध्याय यांचा सहभाग होता. द्वितीय क्रमांक कु. शिवांजली मोहिते, ऋतुजा झांबरे, संध्या डोले, व प्रगती पाटील यांना देण्यात आला.

सदर योग सप्ताह संस्थेचे अध्यक्ष किशोर जैन, विश्वस्त कार्तिक जैन, राजिस्ट्रार. वैभव नांदगावकर, प्राचार्या डॉ.ज्योती जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. या सप्ताहात वैद्य. अर्चीस पाटील, वैद्य. सुचित्रा कुलकर्णी, वैद्य. नम्रता वेंगुर्लेकर, वैद्य. ज्योति जंगले, वैद्य. क्रांती मेटकर यांचे सहकार्य लाभले. सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी वैद्य. अस्मिता नाईक, वैद्य. प्रियंका इंगोले, सौ. प्राजक्ता गणोरकर, वैद्य रवींद्र वावरे यांनी विशेष मेहनत घेतली.