गुन्हेगारी वृत्तमहाराष्ट्र ग्रामीण

जेवणाचे बिल भरण्यासाठी धमकावणाऱ्या तिघांवर नागोठणे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल 

जेवणाचे बिल भरण्यासाठी धमकावणाऱ्या तिघांवर नागोठणे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल 

महेश पवार 
नागोठणे : येथील रिलायन्स कंपनीच्या मोकळ्या जागेत हायड्रॉलिक एक्सेल मशीन असलेला ट्रक एवढे दिवस इथे उभा का ठेवलास असे बोलून ट्रक चालक असलेला फिर्यादी याच्या गालावर चापट मारून व पायावर लाथेने मारहाण करून ट्रक चालकाकडे आधी पाच हजारांची मागणी करून नंतर रोख पैसे नाहीत म्हणून चिकणी येथील हॉटेल गुलमोहर येथे गुगल पे द्वारे ३ हजार रुपयांचे जेवणाचे बिल जबरदस्ती भरण्यास लावणाऱ्या तिघांवर नागोठणे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना ८ ते ९ जून दरम्यान घडली आहे.
यासंदर्भात उपलब्ध झालेल्या माहितीनुसार नागोठण्याजवळील  कुहिरे येथे असलेल्या रिलायन्स कंपनीच्या मोकळ्या जागेत श्रीकांत ओंकारनाथ पांडे, वय ४२, रा. इंदापूर, जि. वाराणसी, सध्या रा. कळंबोली, नवी मुंबई या चालकाने हायड्रॉलिक एक्सेल मशीन असलेला ट्रक उभा करून ठेवला होता. त्यावेळी झोतिरपाडा (ता. पेण) येथील दोन व कुर्डूस (ता. अलिबाग) येथील एक अशा तिघांनी मिळून ट्रक चालकाला इथे ट्रक एवढ्या दिवस का उभा करून ठेवलास असे बोलून दमदाटी करून, त्याला मारहाण करून ५ हजार रुपयांची मागणी केली. त्यावेळी आपल्याकडे रोख पैसे नाहीत अकाऊंटला आहेत असे ट्रक चालकाने सांगितले. त्यामुळे आरोपींनी ट्रक चालकाला त्यांच्याकडे असलेल्या मोटरसायकलवर बसवून चिकणी येथील गुलमोहर हॉटेलला नेले. तेथे या तिन्ही आरोपींनी जेवण करून त्यांचे खाण्या पिण्याचे बिल रुपये ३ हजार जबरदस्तीने ट्रक चालकाला गुगल पे द्वारे भरण्यास सांगितले. तसेच सदर बाब कोणाला सांगितली तर जीवे ठार मारण्यात येईल अशी धमकीही दिल्याने तिन्ही आरोपींना नागोठणे पोलिसांनी २१ जून रोजी रात्री २ वाजता अटक केले. आरोपींना पेण येथील फौजदारी न्यायालयाने २३ जूनपर्यंत पोलिस कोठडी दिली आहे. याप्रकरणी पुढील तपास नागोठणे पोलिस ठाण्याचे सपोनि सचिन कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक जि. डी. पावरा हे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!