महाराष्ट्र ग्रामीणवाहतूक

अहिल्याबाई होळकर योजने अंतर्गत नागोठण्यातील विद्यार्थिनींना मोफत पासचे वाटप

अहिल्याबाई होळकर योजने अंतर्गत नागोठण्यातील विद्यार्थिनींना मोफत एस. टी. पासचे वाटप

महेश पवार 

नागोठणे : महाराष्ट्र राज्य सरकारने राज्यात अनेक वैविध्यपूर्ण योजना सुरु केल्या आहेत. यातीलच एक महत्वाकांक्षी अशी शालेय मुलींसाठी योजना असलेल्या अहिल्याबाई होळकर मोफत विद्यार्थिनी पास योजने मधून रोहा आगाराच्या अंतर्गत नागोठणे स्थानकाच्या वतीने को.ए.सो.च्या नागोठण्यातील बापूसाहेब देशपांडे विद्यासंकुलातील एस.पी. जैन ज्युनिअर काॅलेज मधील १११ विद्यार्थिनींना एस. टी.चे मोफत ओळखपत्र व पासचे वाटप राज्य
परिवहन महामंडळाच्या रोहा आहार अंतर्गत असलेल्या नागोठणे स्थानकाच्या वतीने करण्यात आले. रोहा आगाराचे सहाय्यक वाहतूक अधिक्षक अजिंक्य रोहेकर यांच्या मार्गदर्शनाखाली व त्यांच्या प्रमुख उपस्थितीत एस.पी.जैन ज्यनिअर काॅलेजमध्येच संपन्न झालेल्या या कार्यक्रमाला नागोठणे स्थानकाचे वाहतूक नियंत्रक प्रसाद पाटील, एस. पी.  जैन ज्युनिअर कॉलेजच्या प्राचार्य राधिका ठाकूर, शिक्षक के.एन. पवार, कॉलेजचे इतर शिक्षक आणि विद्यार्थीनी यावेळी बहुसंख्येने उपस्थित होत्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!