खेळमहाराष्ट्र ग्रामीण

जिम मधून चांगले कार्य करण्याची प्रेरणा तरुणांना मिळेल : किशोरशेठ जैन 

नागोठण्यातील माय फिटनेस स्टुडिओ या वातानुकूलित जिमचे उद्घाटन

जिम मधून चांगले कार्य करण्याची प्रेरणा तरुणांना मिळेल : किशोरशेठ जैन 

नागोठण्यातील माय फिटनेस स्टुडिओ या वातानुकूलित जिमचे उद्घाटन
महेश पवार 
नागोठणे : तरुण मुले आपल्याला जिमची व्यवस्था जवळ कशी मिळेल हे बघत असतात. त्यामुळे मोहल्ल्यातील या जिमचा उपयोग नागोठण्यातील लोकांसह मोहल्ल्यातील तरुणांना  जास्त होणार आहे. नागोठण्यात माझ्या हस्ते झालेले  हे तिसऱ्या जिमचे उद्घाटन असून मी ज्याचे उद्घाटन करतो तिथे सर्व चांगलेच घडते. नागोठण्यातील तरुणांमध्ये व्यसनांचे प्रमाण कमी आहे. मात्र येथील सर्व जिमच्या माध्यमातून ते अजून कमी करून नागोठण्यात निर्व्यसनी तरुण वर्ग तयार करायचा आहे. त्यामुळे येथील तरुण फावल्या वेळात जिमकडे आकर्षित झाले तर त्यांना चांगले कार्य करण्याचे सुचेल व या जिम मधून चांगले कार्य करण्याची प्रेरणा तरुणांना मिळेल असे प्रतिपादन शिवसेनेचे रायगड जिल्हा सहसंपर्क प्रमुख किशोर शेठ जैन यांनी केले. नागोठणे मोहल्ल्यातील होतकरू तरुण समीर भिकन व भिकन बंधू यांचेकडून  नागोठण्यातील खुमाचा नाका येथील जमिला प्लाझा या इमारतीत नव्यानेच तयार करण्यात आलेल्या माय फिटनेस स्टुडिओ या वातानुकूलित जिमचे उद्घाटन किशोरशेठ जैन यांच्या हस्ते बुधवारी(दि.२५) सायंकाळी संपन्न झाले त्यावेळी ते बोलत होते. 
या उद्घाटन सोहळ्यास उपस्थित असलेले नागोठणे पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन कुलकर्णी यांनी आपल्या मनोगतात या जिमचा उपयोग शरीर सुदृढ करण्यासाठी होईल अशी आशा  व्यक्त केली. कारण आपण सशक्त झालो तर आपला देश सशक्त होईल. तसेच या जिमचा उपयोग नागोठण्यातील सर्व गावकरी करतील असे बोलून जिमच्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. 
या जिमच्या उद्घाटन सोहळ्यासाठी किशोरशेठ जैन यांच्यासह नागोठण्याच्या सरपंच सुप्रिया महाडिक, पहिले लोकनियुक्त सरपंच व विद्यमान सदस्य डॉ. मिलिंद धात्रक, उपसरपंच अकलाख पानसरे, रोहा पं. स. सदस्य संजय भोसले, वरवठणे सरपंच ऋतुजा म्हात्रे, धनवंती दाभाडे, नागोठणे पोलिस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सचिन कुलकर्णी, पोलिस उपनिरीक्षक सुरज पाटील, माजी पं. स. सदस्य बिलाल कुरेशी,  नागोठणे जामा मशीदचे इमाम जव्वद मापकर, नदीम नाडकर, अशपाक पानसरे, इम्रान पानसरे, इंटरनॅशनल जीम ट्रेनर सज्जाद दांडेकर, मुंबई श्री आनवर शेख, शब्बीर पानसरे, नागोठणे माजी सरपंच लियाकतशेठ कडवेकर, माजी सरपंच रियाज अधिकारी, माजी उपसरपंच सुरेशशेठ जैन, मोहन नागोठणेकर, जहूरुद्दीन सय्यद, गुल्लूशेठ पाटणकर, बाबुशेठ परदेशी, नागोठणे ग्रामपंचायत सदस्य ज्ञानेश्वर साळुंखे, अमृता महाडिक, ज्योती राऊत, धनवंती दाभाडे, वरवठणे ग्रामपंचायत सदस्य गणपत म्हात्रे, सामाजिक कार्यकर्ते नजीरशेठ पानसरे, बाबा मुल्ला, मुजफ्फर कडवेकर, हुसेन पठाण, भास्कर सोलेगावर, शब्बीर अधिकारी, इकबाल खान आदी मान्यवरांसह विविध क्षेत्रातील मान्यवर तसेच जीमचे मालक समीर भिकन व एजाज भिकन त्यांचे कुटुंबीय मसूद भिकन, निसार भिकन, मेहताब भिकन, नाजिया भिकन, फातिमा भिकन, मरियम भिकन, सहेर समीर भिकन, नुरेज निसार भिकन, जीमचे ट्रेनर जहीर काझी आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!