महाराष्ट्र ग्रामीणशैक्षणिक

नागोठणे ज्येष्ठ नागरिक संघातर्फे विद्यार्थ्यांना शालेपयोगी वस्तूंचे वाटप

विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर दिसला आनंद 

नागोठणे ज्येष्ठ नागरिक संघातर्फे विद्यार्थ्यांना शालेपयोगी वस्तूंचे वाटप

विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर दिसला आनंद 
महेश पवार 
नागोठणे : नागोठण्यातील माहेरवाशीण असलेल्या कै. श्रद्धा हरी वैद्य (पूर्वाश्रमीच्या पुष्पा साठे) यांच्या स्मरणार्थ त्यांचे पती हरी वैद्य (डोंबिवली) यांच्याकडून उपलब्ध झालेल्या शालेपयोगी वस्तूंचे वाटप नागोठण्यातील राजिप प्राथमिक कन्याशाळा व राजिप प्राथमिक शाळा जोगेश्वरी नगर (गावठाण) या दोन शाळांतील सुमारे ४२ विद्यार्थ्यांना करण्यात आले. तर जोगेश्वरी नगर शाळेतील १ ली ते ४ थी पर्यंतच्या वर्गातील पहिल्या दोन क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना कै. मो. दे. शिंदे गुरुजी यांच्या स्मरणार्थ त्यांचे सुपुत्र उल्हास शिंदे यांच्याकडून बक्षीस देण्यात आले.
कन्या शाळेतील पटसंख्या असलेल्या २८ विद्यार्थिनींना तर जोगेश्वरी नगर शाळेतील पटसंख्या असलेल्या १४ विद्यार्थी व विद्यार्थिनींना प्रत्येकी दफ्तर, वह्या, कंपास पेटी व खाऊचे वाटप तसेच जोगेश्वरी नगर मधील बालवाडीतील विद्यार्थ्यांनाही ज्येष्ठ नागरिक संघातर्फे खाऊचे वाटप करण्यात आले. 
यावेळी ज्येष्ठ नागरिक संघाचे सचिव उल्हास शिंदे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करून कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट केला. तर अध्यक्ष महादेवसिंग परदेशी यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाला ज्येष्ठ नागरिक संघाचे उपाध्यक्ष मुकुंद मोदगी, खजिनदार दिलीप शहासने, सहसचिव नंदकिशोर मोरे, महिला सभासद किशोरी सोष्टे, कन्या शाळेच्या कार्यक्रमास शिक्षिका कृती पडवळ तर जोगेश्वरी नगर येथे शिक्षिका कल्याणी चौवरे उपस्थित होत्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!