गुन्हेगारी वृत्तमहाराष्ट्र ग्रामीणशैक्षणिक

शांतिबाई ओटरमल जैन आयुर्वेदिक मेडिकल कॉलेजमध्ये अंमली पदार्थ विषयक जनजागृती 

पोलिस उपअधीक्षक रवींद्र दौंडकर यांचे विद्यार्थांना बहुमोल मार्गदर्शन 

शांतिबाई ओटरमल जैन आयुर्वेदिक मेडिकल कॉलेजमध्ये अंमली पदार्थ विषयक जनजागृती 

पोलिस उपअधीक्षक रवींद्र दौंडकर यांचे विद्यार्थांना बहुमोल मार्गदर्शन 
महेश पवार 
नागोठणे : नागोठणे पोलिस ठाण्याच्या वतीने आणि पोलिस ठाणे हद्दीतील असलेल्या  नागोठण्यातील भारतीय एज्युकेशन सोसायटीच्या वेलशेत येथील विद्यासंकुलतील शांतिबाई ओटरमल जैन आयुर्वेदिक मेडिकल कॉलेजमध्ये जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
गुरुवार दिनांक २६ जून रोजी दुपारी १.३० वा. ते २.४५ वाजण्याचे दरम्यान नागोठणे पोलीस ठाणे हद्दीत २६ जून रोजी संपन्न झालेल्या जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त शांतिबाई ओटरमल जैन आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज येथे कार्यशाळा, परिसंवाद वगैरेचे नियोजन करून जनजागृती भेट देऊन, कॉलेज चे विद्यार्थी, शिक्षक यांच्या बरोबर कार्यशाळा व परिसंवाद करून उपस्थित उपविभागीय पोलिस अधिकारी रवींद्र दौंडकर, किशोरशेठ जैन व अन्य मान्यवरांनी मार्गदर्शन केले.
अंमली पदार्थ म्हणजे काय ?,  अंमली पदार्थ कोणकोणते असतात, अंमली पदार्थ सेवन केल्याने मानवी शरीरावर काय दुष्परिणाम होतात, अंमली पदार्थांच्या आहारी जाऊ नये म्हणून घ्यावयाची काळजी आदी विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. 
शांतिबाई ओटरमल जैन या आयुर्वेदिक मेडिकल
कॉलेज मधील जनजागृती कार्यक्रमा दरम्यान शिक्षक व विद्यार्थी यांना जागतिक अंमली पदार्थ विरोधी  दिनाची शपथ देण्यात आली. या कार्यक्रमास मेडिकल कॉलेजचे चेअरमन किशोरशेठ जैन, रोहाचे  उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र दौंडकर, सपोनि सचिन कुलकर्णी, पोलिस उपनिरीक्षक सुरज पाटील, संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिक जैन,  प्राचार्य श्रीमती ज्योती जगताप, पो कॉ. स्वप्नील भालेराव, यांच्यासह मेडिकल कॉलेसह विद्यासंकुलतील सुमारे २५० विद्यार्थी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!