छोटम शेठ भोईर यांच्या समर्थकांचा शिवसेनेत प्रवेश
आमदार महेंद्रशेठ दळवी यांनी केले स्वागत

छोटम शेठ भोईर यांच्या समर्थकांचा व शेकाप कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश
आमदार महेंद्रशेठ दळवी यांनी केले स्वागत
वर्षा सहस्त्रबुद्धे
निडी – नागोठणे : शिवसेनेचा रोहा तालुक्याचा मेळावा नुकताच वावे येथे आमदार महेंद्रशेठ दळवी यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहात संपन्न झाला. वावे येथील शिवसेना रोहा तालुका मेळाव्यामध्ये आमदार महेंद्र शेठ दळवी यांच्या उपस्थितीत शेकाप कार्यकर्त्यांसह तसेच शिवसेना नेते दिलीप उर्फ छोटम शेठ भोईर यांच्या समर्थकांनी त्यांच्याच उपस्थितीमध्ये गजानन गंगाराम मेंद्रे, गणपत मेंद्रे यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. तसेच शेतकरी कामगार पक्षातील सुरेश धर्मा गीजे, नारायण ठाकूर, तन्वेश मंगेश घाणेकर व इतर अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेना जिल्हा प्रमुख राजाभाई केणी, शिवसेना रोहा तालुका प्रमुख ॲड. मनोजकुमार शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा प्रवेश सोहळा संपन्न झाला. यावेळी उपस्थित प्रवेश कर्त्यांचे आमदार महेंद्रशेठ दळवी यांनी स्वागत केले आणि शिवसेना पक्षात सर्वांना योग्य मानसन्मान मिळेल याची ग्वाही प्रवेश कर्त्यांना दिली.
या प्रवेश सोहळ्याला शिवसेना नेते मोतीराम शेठ गिजे, उपतालुकाप्रमुख जगन ठाकूर, सरपंच शारदा गिजे, विभाग प्रमुख मदन गिजे, रोहा शहर प्रमुख मंगेश रावकर, महिला तालुकाप्रमुख अमृताताई धनावडे, तालुका संपर्कप्रमुख योगिता शिर्के, महिला शहर प्रमुख मधुरा सकपाळ, शिवसेनेचे दत्ताराम गिजे, माजी सरपंच गणेश खारिवले, हरीश म्हात्रे, जीवन देशमुख, अविनाश भगत, महेश देशमुख, समिर देशमुख, संदेश मोरे, संकेश खरिवले, संदेश डोळकर व रोहा तालुक्यातील सर्व शिवसैनिक उपस्थित होते