अपघातमहाराष्ट्र ग्रामीण

नागोठणेकरांची सोमवारची रात्र गेली काळोखात 

नागोठणेकरांचे हाल काही संपता संपेनात 

नागोठणेकरांची सोमवारची रात्र गेली काळोखात 

जीर्ण झालेला विजेचे खांब पडल्याने वीज पुरवठा झाला खंडित
नागोठणेकरांचे हाल काही संपता संपेनात
आमदार रविशेठ पाटील यांनी पेण सारखाच नागोठण्यात जनता दरबार घेण्याची मागणी 
महेश पवार 
नागोठणे :  सध्या नागोठणे शहर व परिसरात कोणत्या ना कोणत्या कारणाने विजेचा लपंडाव सुरू असतांनाच सोमवारी (दि.२१) रात्री दहा वाजण्याच्या सुमारास कुंभार आळी परिसरात तसेच रुची हॉटेल जवळील उच्च वीज वाहिनीचा जीर्ण झालेला पोलादी खांब कोसळला. त्यामुळे नागोठण्याची वीज गुल झाली. काही भागात रात्री उशिराने वीज पुरवठा सुरळीत झाला तर काही भागात रात्रभर वीज न आल्याने नागोठणेकरांची सोमवारची रात्र काळोखात गेल्याने नागरिकांचे खूप हाल झाले. तर विजेचा खांब उभे करण्याचे काम सुरू असतांनाच पावसाच्या व्यत्ययामुळे १८ तासानंतर वीज पुरवठा सुरळीत झाला. त्यामुळे सुरळीत सेवा देण्याचा नेहमीच गाजावाजा करणाऱ्या वीज वितरणचा दावा फोल ठरल्याचे दिसून येत आहे.
उन्हाळी दिवसांत तत्कालीन सहाय्यक अभियंता नितीन जोशी यांनी वारंवार शट डाउन घेऊनही विज  दुरुस्तीची आवश्यक ती कामे न झाल्याने  नागोठणेकरांवर वारंवार विजेच्या मोठ्या समस्येला  सामोरे जावे लागत आहे. कधी विजेचा खांब पडला, कधी विजेचा तारा तुटल्या, कधी जंपर तुटला तर कधी कंडक्टर तुटला तर कधी ट्रान्सफॉर्मर बदलायचा आहे  अशा अनेक कारणांमुळे नागोठण्यात दररोज वीज पुरवठा खंडित होत आहे. त्यामुळे विद्युत पुरवठा खंडित झाल्यानंतर वीज वितरणाच्या नावाने केवळ सोशल मीडियावर संताप व्यक्त करून व बोटे मोडणाऱ्या नागोठणेकरांचे विजेच्या बाबतीतील हे हाल कधी संपणार असा प्रश्न इमाने इतबारे न चुकता येईल ते वीज बिल निमूटपणे भरणाऱ्या सर्वसामान्य नागोठणेकर वीज ग्राहकाला पडला आहे.
शांत व संयमी असलेल्या नागोठणेकरांचे हाल काही संपता संपत नसल्याचे दिसून येत आहे. विजेच्या बाबतीत नागोठणेकरांना कुणी वाली आहे की, नाही असा प्रश्नही आता उपस्थित होत आहे. त्यामुळे स्थानिक आमदार रविशेठ पाटील यांनी पेण प्रांत कार्यालयात सोमवारी(दि.२१) विजेच्या अनेक समस्यांवर जसा जनता दरबार घेतला त्याप्रमाणेच वीज वितरणाच्या पेण, पाली व रोहा येथील वरिष्ठ अधिकाऱ्यांना बोलवून नागोठण्यातील विजेच्या समस्यांसाठी नागोठण्यात जनता दरबार घेऊन  विजेच्या समस्यांवर ठोस उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे. 
नागोठणे रुची हॉटेल च्या पुढे चितळकर जिमच्या मागे उच्च वाहिनीचा पोल पडला आहे, त्यामुळे  नागोठणे शहरातील गांधी चौक, मोहल्ला बेकरी, जोगेश्वरी मंदिर परिसर, खडक आळी, अंगार आळी
या भागातील लाईट उद्या सकाळी म्हणजेच मंगळवारी सुरू होईल असा अधिकृत संदेश वीज वितरणाच्या व नागोठण्यातील इतर व्हॉट्स ॲप समूहावर सोमवारी वीज वितरणाच्या कर्मचाऱ्यांकडून रात्री टाकण्यात आला होता. मात्र मंगळवारी (दि.२२) सायंकाळी उशिरापर्यंत वीजपुरवठा सुरळीत झाला नसल्याचे दिसून आले. तसेच शट डाऊन साठी मंगळवारी सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत वेळ असूनही इतर भागातील वीजपुरवठा सुद्धा पूर्ववत न झाल्याने नागोठण्यातील इतर भागातील नागरिकांनीही या प्रकाराबद्दल संताप व्यक्त केला.
गणपतीपूर्वी वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्नशील 
गेले काही दिवस सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे चितळकर जिमच्या मागील बाजूस असलेल्या विजेच्या खांबाच्या ठिकाणी पाणी भरले होते. हाच खांब सोमवारी रात्री कलंडला.  त्यामुळे नागरिकांना रात्रभर अंधारात राहावे लागले. मात्र आमच्या कर्मचारी वर्गाने पाऊस असूनही जीर्ण झालेला विजेचा खांब उभा करण्याबरोबरच उच्च दाब विजेच्या ताराही बदलल्या. शट डाऊन मधील काम वाढल्याने ती कामे करण्यासाठी अधिक वेळ घ्यावा लागला.  मी नव्यानेच नागोठण्याचा पदभार स्वीकारला असल्याने येत्या काही दिवसांत वीजपुरवठा खंडित होणार नाही यासाठी खबरदारी घेऊन नागोठणे शहर व विभागातील विजेच्या सर्व बाबतीत दुरुस्ती करून गणपतीपूर्वी विद्युत पुरवठा कसा सुरळीत होईल यासाठी मी स्वतः प्रयत्नशील आहे.
सत्येंद्र सिंग, 
सहाय्यक अभियंता,
विजवितरण –नागोठणे 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!