निधनमहाराष्ट्र ग्रामीण
लक्ष्मण (एल.डी) म्हात्रे सर यांचे वयोवृद्धत्वामुळे निधन

लक्ष्मण (एल.डी) म्हात्रे सर यांचे वयोवृद्धत्वामुळे निधन
महेश पवार
नागोठणे : कोकण एज्युकेशन सोसायटीच्या नागोठण्यातील गुलाबबाई रामनिवास अग्रवाल विद्यामंदिरचे विद्यार्थी प्रिय सेवानिवृत्त शिक्षक आणि नागोठण्यातील प्रभू आळी भागात अनेक वर्षे वास्तव्य केलेले लक्ष्मण उर्फ एल. डी. म्हात्रे सर (वय ८१) यांचे बुधवार दिनांक २३ जुलै रोजी सकाळी वयोवृद्धत्वामुळे पेण येथील देवनगरी सोसायटी मधील नील निवास या त्यांच्या निवासस्थानी निधन झाले.
त्यांच्या पश्चात दोन विवाहित मुलगे प्रसन्ना व अमित, एक विवाहित मुलगी सौ. रेष्मा संतोष पाटील, सुना, जावई, नातवंडे यांच्यासह मोठा परिवार आहे. दिवंगत लक्ष्मण म्हात्रे यांच्या पार्थिवावर पेण येथील स्मशानभूमीत बुधवारीच सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी त्यांचे नातेवाईक, मित्रपरिवार, शिक्षक वर्ग, मूळ गावातील ग्रामस्थ व पेण मधील नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.
एल.डी. म्हात्रे सर यांनी नागोठण्यातील अग्रवाल विद्यामंदिर मध्ये सुमारे २२ वर्षे सेवा करून तेथेच ते सेवानिवृत्त झाले होते. तसेच त्यांनी कोएसोचे रेवदंडा येथील हायस्कूल व अन्य माध्यमिक विद्यालयातही शिक्षक म्हणून सेवा करतांना ज्ञानार्जनाचे काम केले होते. लक्ष्मण म्हात्रे यांच्या अचानक निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
दिवंगत लक्ष्मण म्हात्रे यांचे दशक्रिया विधी शुक्रवार दिनांक १ ऑगस्ट रोजी श्री क्षेत्र नाशिक येथे तर उत्तरकार्य सोमवार दिनांक ४ ऑगस्ट रोजी पेण येथील नील बंगला, देवनगरी सोसायटी मधील त्यांच्या निवासस्थानी होणार असल्याचे त्यांचा छोटा मुलगा अमित म्हात्रे यांच्याकडून सांगण्यात आले.