आरोग्यमहाराष्ट्र ग्रामीणराजकारण
आमदार रविशेठ पाटील यांची राष्ट्रवादीचे नेते भाई टके यांच्या निवासस्थानी भेट
आ. रविशेठ पाटील यांच्याकडून भाई टके यांच्या तब्यतेची विचारपूस

आमदार रविशेठ पाटील यांची राष्ट्रवादीचे नेते भाई टके यांच्या निवासस्थानी भेट
आ. रविशेठ पाटील यांच्याकडून भाई टके यांच्या तब्यतेची विचारपूस
महेश पवार
नागोठणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि रायगड – रत्नागिरीचे खासदार सुनिल तटकरे यांचे खंदे समर्थक व विश्वासू सहकारी तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे नागोठणे विभागातील नेते भाई टके हे एक महिन्यापूर्वी सकाळी नागोठण्याची ग्रामदेवता श्री जोगेश्वरी मातेच्या दर्शनासाठी गेले होते. त्यावेळी मंदिर प्रांगणात भाई टके पाय घसरून पडल्यामुळे त्यांना दुखापत झाली होती. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना चार महिने घरातच विश्रांती घेण्यास सांगण्यात आले होते. नागोठण्यात गुरुवारी झालेल्या आढावा बैठकीला भाई टके दिसले नाहीत म्हणून आ. रविशेठ पाटील यांनी भाईंची चौकशी केली. तेव्हा भाई टके डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार कुठेही बाहेर न पडता आपल्या निवासस्थानीच विश्रांती घेत असल्याचे कळल्यानंतर पेण सुधागड मतदार संघांचे कार्यसम्राट आमदार रविशेठ पाटील यांनी भाई टके यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट देऊन भाई टके यांच्या तब्यतेची आपुलकीने विचारपूस केली.
भाई टके यांच्या निवासस्थानी आमदार रविशेठ पाटील यांनी दिलेल्या या भेटीदरम्यान त्यांच्या समवेत नागोठण्याचे पहिले लोकनियुक्त सरपंच व विद्यमान सदस्य डॉ. मिलिंद धात्रक, भाजप नेते मारुती देवरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नागोठणे शहर अध्यक्ष बाळासाहेब टके, प्रियदर्शनी चालक मालक वाहतूक संस्थेचे अध्यक्ष सिराजभाई पानसरे, पळस ग्रामपंचायतीचे माजी सरपंच मारुती शिर्के, संतोष लाड, शेखर गोळे, असिफ मुल्ला, बंटी मांडे, तिरत पोलसानी, भरत गिजे, अल्वीन नाकते, तात्या पोत्रिक यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.