वाकण येथिल पान विक्रेते संतोष वर्मा यांचा प्रामाणिकपणा
पान टपरीवर पॅकेट विसरुन गेलेल्या ग्राहकाला केले परत

वाकण येथिल पान विक्रेते संतोष वर्मा यांचा प्रामाणिकपणा
पान टपरीवर पॅकेट विसरुन गेलेल्या ग्राहकाला केले परत
दिनेश ठमके
सुकेळी : आजच्या काळातही अनेकजण आपले काम हे प्रामाणिकपणाने करत असतांनाच मुंबई – गोवा महामार्गावरील वाकण नाक्यावर अनेक वर्षांपासून पान विक्रिचे व्यावसाय करणारे संतोष वर्मा यांंनी आपल्या दुकानात आलेल्या ग्राहकाचे पॅकेट विसरुन गेलेल्या ग्राहकाला परत करीत एक माणुसकीचे दर्शन घडविले आहे. याबाबतीत संतोष वर्मा यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
याबाबतीत उपलब्ध माहितीनुसार मुंबई -गोवा महामार्गावरुन दापोली (रत्नागिरी) बाजुकडे प्रवास करणारे उल्हास मदन साळगावकर हे आपल्या कारन वाकण नाक्यावर आले असता ते नागोठण्याजवळील वाकण नाका येथील एका पान टपरीवर काही खरेदीसाठी थांबले. खरेदी केल्यानंतर घाईगडबडीत ते आपला पॅकेट त्या पानटपरीवर विसरुन गेले. जवळपास खांब नाक्याच्या पुढे गेल्यानंतर उल्हास यांच्या आपले पॅकेट पान टपरीवर राहिल्याचे लक्षात आल्यानंतर ते पुन्हा वाकण या ठिकाणी पान टपरीवर जाऊन विचारणा केली असता संतोष वर्मा यांनी एक आपुलकीची भावना दाखवत ते पॅकेट परत केले. या पॅकेटमध्ये जवळपास ५ ते ६ हजार रुपाय रोख रक्कम, लायसन्स, अजुनही कही कागदपत्रे उपलब्ध होती. संतोष वर्मा यांनी या सर्व वस्तु रितसर उल्हास यांना परत केल्यामुळे अद्यापही थोड्या फार प्रमाणात माणुसकी जिवंत असल्याची जाणीव करून दिली आहे. संतोष यांच्या प्रामाणिकपणाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.




