वडखळ पोलिस स्टेशनचे नवनियुक्त पोलिस निरीक्षक संतोष जाधव यांना पोलिस बाॅईज पेण यांनी दिल्या शुभेच्छा

वडखळ पोलिस स्टेशनचे नवनियुक्त पोलिस निरीक्षक संतोष जाधव यांना पोलिस बाॅईज पेण यांनी दिल्या शुभेच्छा
सुकेळी ( दिनेश ठमके) : पेण तालुक्यातील वडखळ पोलिस स्टेशन मधुन राष्ट्रपती पुरस्कार विजेते पोलिस निरीक्षक प्रसाद पांढरे यांची बदली झाल्यामुळे त्यांचा जागी नुकतीच संतोष जाधव यांची वडखळ पोलिस स्टेशनच्या पोलिस निरीक्षकपदी नियुक्ती झाल्यामुळे रविवार (दि.१४) रोजी महाराष्ट्र पोलीस बाॅईज संघटना पेण येथिल संपूर्ण टिमने वडखळ पोलिस स्टेशनमध्ये जाऊन त्यांची भेट घेत पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या.

यावेळी महाराष्ट्र पोलीस बाॅईज संघटनेचे पेण तालुका अध्यक्ष योगेश म्हात्रे, उपाध्यक्ष चंदन अहिरे, शहर अध्यक्ष गणेश पोवळे, पेण महिला तालुका अध्यक्षा शैला तुरे, उपाध्यक्षा मोनिका बडे, संचिता रांगटे, प्रमोद तुरे यांनी जाधव यांना शुभेच्छा दिल्या. दरम्यान या टीमकडे नवनियुक्त पोलिस निरीक्षक संतोष जाधव यांनी आपला स्वतःचा मोबाईल नंबर देत कोणत्याही अडी अडचणीमध्ये जी काही मदत व सहकार्य लागल्यास कधीही मला फोन करा मी माझ्यापरीने तुमच्या तसेच जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी नेहमीच कटीबद्ध राहीन असे आश्वासन दिले.




