धार्मिक सोहळामहाराष्ट्र ग्रामीणशैक्षणिकसांस्कृतिक
नागोठण्यात पर्यावरण जनजागृतीपर रॅली
सेवा सप्ताह निमित्ताने राबविणार विविध उपक्रम

नागोठणे लायन्स क्लब कडून नागोठण्यात पर्यावरण जनजागृतीपर रॅली
सेवा सप्ताह निमित्ताने राबविणार विविध उपक्रम
महेश पवार
नागोठणे : लायन्स क्लब इंटरनॅशनल या सेवाभावी संस्थेकडून जगभर १ ते ८ ऑक्टोबर दरम्यान सेवा सप्ताह राबविण्यात येत आहे. त्यानुसारच रायगड जिल्ह्यात नावलौकिक मिळविलेल्या नागोठणे लायन क्लब कडूनही सेवा सप्ताह निमित्त विविध उपक्रम राबविले जात आहेत. याचाच एक भाग असलेल्या पर्यावरण विषयक जनजागृती रॅलीचे आयोजन नागोठणे लायन्स क्लब कडून शुक्रवार दिनांक ३ ऑक्टोबर रोजी करण्यात आले होते.

या रॅलीची सुरुवात नागोठण्यातील गवळ आळी येथील श्री राधाकृष्ण व साईबाबा मंदिरापासून सकाळी पावणे अकरा वाजता करण्यात आली. त्यानंतर ही रॅली गांधी चौक, ग्रामदेवता श्री जोगेश्वरी माता मंदिर, ग्रामपंचायत कार्यालय, छत्रपती शिवाजी महाराज चौक, बाजारपेठ, खुमाचा नाका मार्गे पुन्हा श्री राधाकृष्ण मंदिरात पावणेबारा वाजण्याच्या सुमारास आल्यानंतर या रॅलीचा समारोप करण्यात आला. या रॅलीत पर्यावरण विषयक जागृती पर अनेक घोषणा देण्यात आल्या. नागोठणे लायन्स क्लबचे अध्यक्ष ला. सखाराम ताडकर, लायन्स क्लबचे चार्टर्ड प्रेसिडेंट ला. प्रकाश जैन, पदाधिकारी ला. विवेक सुभेकर, ला. अनिल गीते, ला. विलास चौलकर, ला. जयराम पवार, ला. दौलत मोदी, ला. विवेक करडे, ला. दीपक लोणारी, ला. विद्या म्हात्रे, नागोठणे पोलिस ठाण्याचे गोपनीय विभागाचे पो. कॉ. स्वप्नील भालेराव, पो. कॉ. व्हि. आर. बांधणकर, मधुकर चौलकर, दिनेश घाग, मनोहर कडव, जगदीश चौलकर, सुजित चौलकर आदींसह भारतीय एज्युकेशन सोसायटीच्या एस.डी. परमार इंग्लिश मीडियम स्कूलच्या शिक्षिका स्नेहा काटले, स्मिता पाटील यांच्यासह इयत्ता ९ वी व १० वीचे ४६ विद्यार्थी या रॅलीत सहभागी झाले होते.

या रॅलीत पर्यावरणाची रक्षा जगाची सुरक्षा,झाडे लावा झाडे जगवा, पाणी आडवा पाणी जिरवा पाणी वाचवा, प्लास्टिकचा वापर टाळा, वाचाल तर वाचाल, भ्रष्टाचाराची साखळी तोडा भ्रष्टाचारमुक्त भारत बनवा, पोलीस यंत्रणेला सहकार्य करा शांतता एकोपा टिकवा, शिक्षणाकडे वळा अंधश्रद्धा मुक्त भारत बनवा, वाहतूक नियमांचे पालन करा, सुख समृद्धीचा झरा शिक्षण हाच मार्ग खरा असे जनजागृतीपर संदेश देणारे फलक रॅलीत रॅलीत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांकडून हातात घेण्यात आले होते.

तसेच या रॅलीत लावण्यात आलेल्या देश भक्तीपर गीतांनी देशभक्तीपर वातावरण निर्माण झाले होते. या रॅलीसाठी भारतीय एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष किशोर जैन, शाळा समितीचे अध्यक्ष सुरेश जैन, मुख्याध्यापिका अमृता गायकवाड यांचे सहकार्य मिळाले.





