खेळमहाराष्ट्र ग्रामीणमहिला विशेष
कु. दिव्या मढवी व कु. रिया घासे यांची १९ वर्षाखालील कबड्डी स्पर्धेच्या विभागीय स्तरावर निवड
बापूसाहेब देशपांडे विद्यासंकुलातील दोन्ही विद्यार्थिनींचे होत आहे अभिनंदन

कु. दिव्या मढवी व कु. रिया घासे यांची १९ वर्षाखालील कबड्डी स्पर्धेच्या विभागीय स्तरावर निवड
बापूसाहेब देशपांडे विद्यासंकुलातील दोन्ही विद्यार्थिनींचे होत आहे अभिनंदन
महेश पवार
नागोठणे : जिल्हास्तरावरील शालेय कबड्डी स्पर्धा नुकतीच जिल्हा क्रिडा संकुल, नेहुली अलिबाग येथे संपन्न झाली. महाड, कर्जत, माणगाव या संघांना पराभूत करून नागोठणे व रोहा संघाने अंतिम फेरी गाठली. अंतिम फेरीमध्ये पीएनपी अलिबाग संघ व नागोठणे संघ यांच्यात चुरशीच्या झालेल्या सामन्यात नागोठणे संघाने उपविजेते पटकाविले. याच नागोठणे संघातून खेळणाऱ्या कु. दिव्या लक्ष्मण मढवी व कु. रिया राजेंद्र घासे या दोन विद्यार्थिनी खेळाडूंची पालघर (जि. ठाणे) येथे होणाऱ्या विभागीय स्तरावरील स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या दोन्ही विद्यार्थिनींचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

सानेगाव (रोहा) आश्रम शाळा येथे नुकत्याच संपन्न झालेल्या तालुका स्तरीय कबड्डी स्पर्धेत कोकण एज्युकेशन सोसायटीच्या नागोठण्यातील बापूसाहेब देशपांडे विद्यासंकुलातील श्रीमती गु. रा. अग्रवाल विद्यामंदिर व कै. सरेमल प्रतापमल जैन कनिष्ठ महाविद्यालयच्या १९ वर्षाखालील गटात मुलींनी विजेतेपद पटकाविल्याने या मुलींच्या संघाची जिल्हास्तरावर निवड झाली होती.
या स्पर्धेसाठी शाळा समिती चेअरमन नरेंद्रशेठ जैन, कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य डी. एम. पवार सर, सकाळ सत्र प्रमुख नेताजी गायकवाड, दुपार सत्र प्रमुख रमेश जेडगे, स्टाफ सेक्रेटरी भीमराव शिंदे, अनिल तिरमले, क्रीडा प्रमुख पवन पाटील, सहाय्यक अबेसिंग गावित, शाळेचे ज्येष्ठ लेखनिक संतोष गोळे तसेच इतर सर्व शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.
दरम्यान विभागीय कबड्डी स्पर्धा ठाणे जिल्ह्यातील पालघर येथे पार पडणार आहे.




