कायदेविषयकमहाराष्ट्र ग्रामीण
ॲड. सागर भगत यांच्या पालीतील कार्यालयाचे उद्घाटन

ॲड. सागर भगत यांच्या पालीतील कार्यालयाचे उद्घाटन
महेश पवार
नागोठणे : दिवाणी व फौजदारी न्यायालय पाली (ता.सुधागड) येथील न्यायालयात कार्यरत असलेले पाली येथील तरुण वकील ॲड. सागर सरिता हिराकांत भगत यांच्या खडकआळी (पाली) येथील नूतन कार्यालयाचे उद्घाटन शेतकरी कामगार पक्षाचे खजिनदार व युवा नेतृत्व अतुल नमिता नंदकुमार म्हात्रे (मास्टर ऑफ आर्किटेक्ट लंडन) यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये शनिवार दिनांक ११ ऑक्टोबर रोजी सकाळी करण्यात आले.

या उद्घाटन कार्यक्रमाला पाली नगरपंचायतीचे नगराध्यक्ष पराग मेहता, पाली येथील ज्येष्ठ वकील ॲड. नितीन शेवाळे, ॲड. सुभाष पाटील, ॲड. धनंजय धारप, ॲड. संजयकुमार शहा, ॲड. प्रवीण कुंभार, ॲड. दिनेश उफाळे, ॲड. वैभवी सावंत आदींसह अनेक मान्यवर, भगत कुटुंबीय व ॲड. सागर भगत यांचा मित्रपरिवार यावेळी बहुसंख्येने उपस्थित होता. यावेळी उपस्थित सर्वांनी ॲड. सागर भगत यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.





