कायदेविषयकमहाराष्ट्र ग्रामीण
अधिवक्ता परिषदेच्या रायगड जिल्हा उपाध्यक्षपदी ॲड. धनंजय धारप यांची निवड
ॲड. धनंजय धारप यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव

अधिवक्ता परिषदेच्या रायगड जिल्हा उपाध्यक्षपदी ॲड. धनंजय धारप यांची निवड
ॲड. धनंजय धारप यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव
महेश पवार
नागोठणे : अधिवक्ता परिषद, रायगड व पनवेल वकील संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने पनवेल येथे ८ नोव्हेंबर रोजी संपन्न झालेल्या रायगड जिल्हा अधिवक्ता कार्यशाळेमध्ये अधिवक्ता परिषदेच्या रायगड जिल्ह्यातील नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या. यामध्ये रोहा व पाली येथील न्यायालयात सुमारे २५ वर्षे यशस्वी प्रॅक्टीस करणारे विधीज्ञ आणि अधिवक्ता परिषदेच्या रोहा शाखेचे अध्यक्ष ॲड. धनंजय धारप यांची अधिवक्ता परिषदेच्या रायगड जिल्हा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. ॲड. धनंजय धारप यांना अधिवक्ता परिषदेच्या जिल्हा उपाध्यक्षपदी बढती मिळाल्याने त्यांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.

आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके सभागृह, पनवेल येथे शनिवार दिनांक ८ नोव्हेंबर रोजी संपन्न झालेल्या या कार्यशाळेला प्रमुख पाहुणे म्हणून माहिती व तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार, पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर, महाराष्ट्र गोवा बार कौन्सिलचे माजी अध्यक्ष व विद्यमान सदस्य ॲड. पारिजात पांडे, जळगाव येथील ज्येष्ठ विधिज्ञ सुशील अत्रे, अधिवक्ता परिषदेचे कोकण प्रांत अध्यक्ष व मुंबई उच्च न्यायालयातील वरिष्ठ विधीज्ञ संजीव गोरवाडकर, अधिवक्ता परिषदेचे कोकण प्रांत पालक ॲड. दीपक गायकवाड, अधिवक्ता परिषदेचे रायगड जिल्हा अध्यक्ष व जिल्हा सरकारी वकील ॲड. संतोष पवार, अधिवक्ता परिषदेचे कोकण प्रांत सचिव ॲड. श्रीराम ठोसर, अधिवक्ता परिषद कोकण प्रांत सचिव ॲड. रेखा कांबळे, पनवेल वकील संघटनेचे अध्यक्ष ॲड. मनोज भुजबळ, अधिवक्ता परिषद पनवेलचे अध्यक्ष ॲड. राजेंद्र देशमुख, अधिवक्ता परिषद रायगडचे सचिव ॲड. सुनील तेलगे, पनवेल वकील संघटनेचे अध्यक्ष ॲड. मनोज भुजबळ, भाजपाचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष अविनाश कोळी, पनवेल वकील संघटनेचे सचिव ॲड. प्रल्हाद खोपकर आदींसह अनेक मान्यवर आणि अधिवक्ता परिषदेच्या रोहा शाखेचे पदाधिकारी व सदस्य यावेळी उपस्थित होते.




