अपघातकायदेविषयकमहाराष्ट्र ग्रामीण

नागोठण्यात बिबट्या आला रे आला ?

पाऊलांचे ठसे निघाले कुत्र्याचे

नागोठण्यात बिबट्या आला रे आला ?

नागोठणे आय टी आय च्या पत्राने खळबळ 
ते पाऊलांचे ठसे निघाले कुत्र्याचे
अफवा पसरविणाऱ्यांवर कारवाईचे संकेत
महेश पवार 
नागोठणे : सध्या सोशल मीडिया आणि सर्वत्रच बिबट्या आढळून आल्याच्या वृत्ताने खळबळ निर्माण झाली आहे. असे असतांनाच नागोठणे आय टी आय च्या मागील बाजूस असलेल्या झाडी झुडपांत असलेल्या जागेत बिबट्याच्या च्या संशयास्पद पाऊलखुणा आढळून आल्याचे आय टी आय च्या सुरक्षा रक्षकाने संशय व्यक्त केल्याने आणि संबंधित विभागाला पाठविण्यासाठी तयार केलेले तशा आशयाचे पत्र नागोठणे आय टी आय कडून संबंधित विभागाला पाठविल्याने आणि ते पत्र नागोठण्यातील व्हॉट्स ॲप ग्रूपवर व्हायरल झाल्याने खळबळ निर्माण झाली. मात्र हे ठसे फॉरेन्सिक टीमला कुत्र्याच्या पायाचे आढळून आल्याने नागोठणे शहर व परिसरात सर्वांनी सुटकेचा श्वास घेतला घेतला आहे. मात्र असे असतांनाच सध्या बिबट्याच्या नावाने सर्वत्र बोंब असल्याने कुणीही खात्री केल्याशिवाय सोशल मीडियावर अफवा पसरवू नये अन्यथा संबंधिताविरोधात गुन्हा दाखल करण्यात येईल असे संकेत वन खात्याचे नागोठणे वन परिक्षेत्र अधिकारी दादासाहेब कुकडे यांनी दिले आहेत.
यासंदर्भात उपलब्ध झालेल्या माहितीनुसार या संदर्भात नागोठणे औद्योगिक प्रशिक्षण संस्थेकडून रोहा प्रांत अधिकारी, रोहा तहसीलदार, सरपंच नागोठणे ग्रामपंचायत तसेच जिल्हा वनाधिकारी व स्थानिक कार्यालय यांना २९ डिसेंबर रोजी एक पत्र पाठवून नागोठणे आय टी आय परिसरात बिबट्या आढळल्याची लेखी माहिती कळविली आहे.  नागोठणे आय टी आय कडून पाठविण्यात आलेल्या या पत्रात म्हटले आहे की, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था नागोठणे या संस्थेच्या परिसरामध्ये व अवतीभवती बिबट्याच्या पायाचे ठसे आढळून आले असून व प्रत्यक्ष तीन ते चार दिवसांपासून बिबट्या परिसरात वावरताना दिसून आलेला आहे. सदर संस्थेमध्ये एकूण ४०० ते ४५० प्रशिक्षणार्थी विविध व्यवसायामध्ये प्रशिक्षण घेत आहेत. सदर परिसरामध्ये बिबट्या वाघाचे दर्शन व पायाचे ठसे दिसून आल्यामुळे या संस्थेतील कर्मचारी व प्रशिक्षणार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाल्यामुळे त्याचा परिणाम प्रशिक्षणार्थ्यांवर झाल्याचे दिसून येत आहे. तरी संस्थेच्या परिसरामध्ये बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी आपल्या स्तरावर त्वरित उपाययोजना करण्यात यावी अशी विनंती या पत्राद्वारे संबंधितांना  करण्यात आली आहे.
दरम्यान नागोठणे औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या मागील बाजूस असलेल्या झाडी झुडपांतील परिसरात आढळलेल्या प्राण्याच्या पायाचे ठसे पुणे येथील फॉरेन्सिक लॅब मध्ये पाठवले असता तसेच रोहा येथील फॉरेन्सिक टीमने पायाचे ठसे प्रत्यक्ष जागेवर येऊन तपासले असता हे पायाचे ठसे कुत्र्याचे असल्याचा निष्कर्ष पुणे फॉरेन्सिक लॅब व रोहा येथील फॉरेन्सिक टीमने काढला असल्याची अधिकृत माहिती नागोठणे वनपरिक्षेत्र अधिकारी दादासाहेब कुकडे यांनी दिली आहे.
दरम्यान या प्रकरणा नंतर दादासाहेब कुकडे यांनी नागोठणे आय टी आय ला पत्र काढून अशा प्रकारच्या अफवा पसरविण्यापूर्वी वन खात्यास कळविण्यासंदर्भात कडक शब्दात सुनावले आहे. तसेच या प्रकरणात नागोठणे पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सचिन कुलकर्णी यांनीही आय टी आय च्या संबंधित जागेवर जाऊन पाहणी केल्याने फॉरेन्सिक टीमच्या अहवाला नंतर पुढील योग्य ती कार्यवाही करण्यात येईल असे स्पष्ट केले आहे. 

 रोहा येथील सागर दहिंबेकर यांच्या रेस्क्यू टीमकडून नागोठणे वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयातील स्टाफ सह व नागोठणे आयटीआय मधील कर्मचारी यांचे समक्ष आज दिनांक ३० डिसेंबर रोजी स्थळ पाहणी करण्यात आली आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या अफवा पसरविण्यात येऊ नये. तसेच यापुढे आपल्या संस्थेच्या परिसरात आपणास वन्यप्राणी आढळून आल्यास वनविभागास तात्काळ संपर्क करून अवगत करावे. अन्यथा अशा प्रकारच्या अफवा पसरविल्यास नियमानुसार कार्यवाही करण्यात येईल.

– दादासाहेब कुकडे,
वनपरिक्षेत्र अधिकारी, नागोठणे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!