निवडणूकमहाराष्ट्र ग्रामीणराजकारण

खासदार धैर्यशीलदादा पाटील यांच्याकडून राष्ट्रवादी व भाजपा युतीची घोषणा 

रोहा पंचायत समितीच्या सुकेळी गणाची  जागा भाजपला 

खासदार धैर्यशीलदादा पाटील यांच्याकडून राष्ट्रवादी व भाजपा युतीची घोषणा 

रोहा पंचायत समितीच्या सुकेळी गणाची जागा भाजपला 
महेश पवार 
नागोठणे : केंद्र सरकारमध्ये पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली हा देश सर्वांचा,  गोरगरिबांचा आहे यासाठी त्यांनी अनेक योजना आणल्या. हेच धोरण ठेवून राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र  फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकारने या सर्व योजना राज्यातही प्रभावीपणे राबविल्या. महायुती मधील तीन पक्ष राज्यात सख्ख्या भावाप्रमाणे जबाबदाऱ्या पार पाडत आहेत. मात्र स्थानिक पातळीवर वेगवेगळे मतप्रवाह असू शकतात. त्यामुळेच रायगड जिल्ह्यात बहुतांशी भागात भाजपाची राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर युती झालेली आहे. वरिष्ठ पातळीवर हा निर्णय झालेला असून त्या सूचनांचा सर्वांनी आदर करीत पक्षनिष्ठा काय असते ते मान्य करून रोहा तालुक्यातही भाजपाची राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर युती होत असल्याचे व आमचे उमेदवार उमेदवारी अर्ज मागे असल्याचे तसेच रोहा पंचायत समितीच्या सुकेळी गणाची एकमेव जागा भाजपा योगिता शिद यांच्या उमेदवारीने युतीच्या माध्यमातून लढवित असल्याचे भाजपाचे दक्षिण रायगड जिल्हा अध्यक्ष, खासदार धैर्यशीलदादा पाटील यांनी नागोठण्यातील पत्रकार परिषदेत जाहीर केले.
रायगड जिल्हा परिषदेच्या नागोठणे गटासाठी अपक्ष उमेदवार म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केलेले सोपान जांबेकर, रोहा पंचायत समितीच्या नागोठणे गणातून उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या रंजना माळी, सुकेळी  गणातील सुषमा वाघमारे, कोलाड गणातील कल्पेश माने, आंबेवाडी गणातील संजय लोटणकर, न्हावे गणातील ज्योत्स्ना ठाकूर व घोसाळे गणातील अतुल पाटील हे सर्व उमेदवार पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या सूचनेनुसार राष्ट्रवादी काँग्रेसची युती पक्की करून व महायुतीचा आदर म्हणून आपापले उमेदवारी अर्ज मागे घेत असून भाजपा – राष्ट्रवादी युतीच्या माध्यमातून युतीच्या उमेदवारांना भाजपा सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचेही यावेळी खासदार धैर्यशीलदादा पाटील यांनी स्पष्ट केले. 
भाजपाच्या जिल्हा उपाध्यक्षा श्रेया कुंटे यांच्या निवासस्थानी झालेल्या या पत्रकार परिषदेला भाजपा जिल्हा उपाध्यक्ष सोपान जांबेकर, श्रेया कुंटे, मारुती देवरे, तालुका अध्यक्ष महेश ठाकूर, तालुका सरचिटणीस एकनाथ ठाकूर, आनंद लाड, ज्येष्ठ नेते महादेव मोहिते, अनंत वाघ, युवा मोर्चा तालुका अध्यक्ष निखिल मढवी, सुकेळी गणाच्या उमेदवार योगिता विलास शिद, ॲड. गणेश जाधव, गणेश घाग, गणपत म्हात्रे,  रंजना माळी, विवेक रावकर,  सिराजभाई पानसरे, संतोष लाड, कल्पेश माने, भगवान शिद, अशोक अहिरे, विठोबा माळी, शेखर गोळे, प्रमोद नागोठणेकर, मोरेश्वर म्हात्रे, सागर शिर्के, धनराज उमाळे, तिरत पोलिसानी, संतोष डाकी आदींसह भाजपा कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!