निवडणूकमहाराष्ट्र ग्रामीणराजकारण

नागोठणे मोहल्ला भागात शिवसेनेचे सुमित काते यांना मताधिक्य देण्याचा निर्धार 

शिवसेनेच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ मोहल्ल्यात विक्रमी कॉर्नर सभा 

नागोठणे मोहल्ला भागात शिवसेनेचे सुमित काते यांना मताधिक्य देण्याचा निर्धार 
शिवसेनेच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ मोहल्ल्यात विक्रमी कॉर्नर सभा 
रायगडचा बुलंद आवाज टीम 
नागोठणे : रायगड जिल्हा परिषदेच्या नागोठणे गट मतदार संघात तसेच रोहा पंचायत समितीच्या नागोठणे व सुकेळी गणातील निवडणुकीसाठी एकत्र आलेल्या दोन्ही शिवसेना तसेच त्यांना साथ लाभलेल्या मित्र पक्ष काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व आर पी आय या पाच पक्षांची मिळून तयार करण्यात आलेल्या परिवर्तन विकास आघाडीचा नागोठणे शहर व विभागातील ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात प्रचाराचा धुरळा उडत आहे. असे असतांनाच परिवर्तन विकास आघाडीच्या जि. प. नागोठणे गटाचे उमेदवार सुमितदादा काते, पंचायत समितीच्या नागोठणे गणाच्या उमेदवार अंजली हिराजी दुर्गावले यांच्या प्रचारार्थ नागोठण्यातील हुजरा मोहल्ला भागात शुक्रवारी(दि.३०) रात्री घेण्यात आलेल्या कॉर्नर सभेला विक्रमी गर्दी झाली होती. या कॉर्नर सभेला मोहल्ल्यात कधी नव्हे एवढी गर्दी झाल्याने मोहल्ल्याचा मीच नेता आहे असे सांगणाऱ्या  विरोधकांच्या छातीत धडकी भरल्याचे सांगून नागोठणे मोहल्ला भागात सुमित काते यांना मताधिक्य देण्याचा निर्धार परिवर्तन आघाडीच्या सर्व नेतेगण व कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.
जिल्हा परिषद उमेदवार सुमितदादा काते यांनी आपल्या मनोगतात सांगितले की,  नागोठणे मोहल्ला भागात सदिच्छा भेट दिली असता येथील कार्यकर्त्यांनी व ग्रामस्थांनी जिल्हा परिषद निवडणुकीसाठी सर्वांनी एकजुटीने जाहीर पाठिंबा व मनःपूर्वक शुभेच्छा दिल्याबद्दल जिल्हा परिषद निवडणुकीतील नागोठणे गटाचे उमेदवार सुमितदादा काते यांनी सर्वांचे आभार मानले. तसेच मोहल्ला भागातील सर्व ग्रामस्थांनी दाखवलेला विश्वास, प्रेम आणि पाठिंबा निश्चितच नव्या ऊर्जा व जबाबदारीची जाणीव करून देणारा आहे. नागोठणे मोहल्ला भागाच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव कटिबद्ध राहण्याचा निर्धार यावेळी सुमितदादा काते यांच्याकडून व्यक्त करण्यात आला.  यावेळी मोहल्ला भागातील बुलंद आवाज सुहेल पानसरे यांनी आपल्या खास शैलीत व विविध मुद्द्यांना हात घालत विरोधकांचा समाचार घेतला. यावेळी उमेदवार अंजली दुर्गावले, काँग्रेसचे अशपाक पानसरे, शिवसेनेचे प्रकाश मोरे, दिनेश घाग, संजय कणघरे आदींनी आपले विचार मांडून परिवर्तन विकास आघाडीच्या उमेदवारांना निवडून देण्याचे आवाहन केले. 
नागोठणे हुजरा मोहल्ला भागात घेण्यात आलेल्या या कॉर्नर सभेला जिल्हा परिषद उमेदवार सुमितदादा काते, पंचायत समिती उमेदवार अंजली दुर्गावले, अरुणा हंबीर यांच्यासह शिवसेना उपतालुका प्रमुख मनोजदादा खांडेकर, काँग्रेसचे शहर अध्यक्ष अशपाक पानसरे, ज्येष्ठ नेते शब्बीर, अधिकारी, सगीर अधिकारी, युवा नेते सद्दाम दाफेदार, पप्पू अधिकारी,  आर पी आय रोहा तालुका अध्यक्ष संतोष गायकवाड,  उबाठा शिवसेनेचे गणपत म्हात्रे, इम्रान पानसरे, लहू तेलंगे, संजय पिंपळे, शिवसेना विभागप्रमुख प्रवीण ताडकर, विभाग संघटक दिनेश घाग, शहर प्रमुख संतोष चितळकर, माजी सरपंच निलोफर पानसरे,  ग्रामपंचायत सदस्या शबाना मुल्ला, शहनाज अधिकारी, फय्याज पानसरे, विजय धामणे, प्रकाश मोरे, आसिफ मुल्ला, याकुब सय्यद, खुर्शिद अधिकारी, सचिन भोसले, संजय कणघरे, शैलेश कासार, हिराजी दुर्गावले, दीपक दुर्गावले, फरद काझी, यास्मिन पानसरे, इराम पानसरे, तमीना पानसरे, फरीदा पानसरे व इतर महिला आदींसह परिवर्तन विकास आघाडीचे नागोठण्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच मोहल्ला भागातील नागरिक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!