निवडणूकमहाराष्ट्र ग्रामीणराजकारण

कोळी महासंघाचा समृद्धी कोळी यांना पाठिंबा

अध्यक्ष रमेशदादा पाटील यांनी दिल्या शुभेच्छा 

कोळी महासंघाचा समृद्धी कोळी यांना पाठिंबा

अध्यक्ष रमेशदादा पाटील यांनी दिल्या शुभेच्छा 
रायगडचा बुलंद आवाज टीम 
नागोठणे : भारतीय जनता पक्षाचे माजी आमदार तथा महाराष्ट्र कोळी महासंघाचे अध्यक्ष रमेशदादा पाटील यांनी रोहा पंचायत समितीच्या नागोठणे गणाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवार सौ. समृद्धी संतोष कोळी यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट देऊन या निवडणुकीत कोळी महासंघाचा जाहीर पाठिंबा समृद्धी कोळी यांना व्यक्त केला. तसेच कोळी महासंघाचे अध्यक्ष व माजी आमदार रमेशदादा पाटील यांनी समृद्धी कोळी यांना निवडणुकीसाठी शुभेच्छा दिल्या.
आपली कोळी महिला रोहा तालुका पंचायत समितीत गेलीच पाहिजे. त्यांनी सर्व कोळी समाजाला सौ.  समृद्धी संतोष कोळी यांच्या घड्याळ या निशाणी समोरील बटण दाबून भरघोस मतांनी विजयी करा असे आवाहन रमेशदादा पाटील यांनी यावेळी उपस्थितांना केले. यावेळी चंद्रकांत कोळी, संतोष कोळी, नंदकुमार कोळी, सुधाकर पारंगे, रोशन पारंगे, पुंडलिक कृष्णा ताडकर, शाहीर पुंडलिक ताडकर, विजय पारंगे, श्याम पाटील,अंकुश ताडकर,अनिल पाटील, तुळशीराम पारंगे,अशोक पाटील,सखाराम घासे व दिनेश बावकर इत्यादी कार्यकर्ते व कोळी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!