आरोग्यमहाराष्ट्र ग्रामीण
नागोठणे लायन्स क्लबच्या नेत्रचिकित्सा शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद
४५ रुग्णांची तपासणी व १२ मोतीबिंदू रुग्णांची शस्त्रक्रिया

नागोठणे लायन्स क्लबच्या नेत्रचिकित्सा शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद
४५ रुग्णांची तपासणी व १२ मोतीबिंदू रुग्णांची शस्त्रक्रिया
नागोठणे : महेश पवार
नागोठणे लायन्स क्लबचे चार्टर्ड प्रेसिडेंट लायन प्रकाश जैन यांचे दिवंगत भाऊ स्व. फुटरमल सरेमल जैन यांच्या स्मरणार्थ येथील शांतीनगर भागातील स्व. बाळासाहेब ठाकरे बालोद्यान मध्ये बुधवारी (दि.४) संपन्न झालेल्या मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या शिबिरात ४५ नागरिकांच्या डोळ्यांची तपासणी करण्यात आली होती. यापैकी मोतीबिंदू आढळलेल्या १२ रुग्णांवर शंकरा आय हॉस्पीटल येथे शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. यावेळी लायन जयराम पवार यांनी फुटरमल जैन यांच्या आठवणींना उजाळा दिला.
नागोठणे लायन्स क्लब आणि नवीन पनवेल येथील आर झुनझुनवाला शंकरा आय हॉस्पीटल यांच्या संयुक्त विद्यमाने संपन्न झालेल्या या शिबिराला चार्टर्ड प्रेसिडेंट लायन प्रकाश जैन, एम जे एफ लायन सुधाकर जवके, एम जे एफ लायन यशवंत चित्रे, नागोठणे लायन्स क्लबचे अध्यक्ष सखाराम ताडकर, उपाध्यक्ष विशाल शिंदे, सचिव डॉ. अनिल गीते, विलास चौलकर, जयराम पवार, विजय शहासने, संतोष शहासने, दीपक गायकवाड, विनोद सावंत, सुजाता जवके, विद्या म्हात्रे, सिद्धेश काळे, दीपक लोणारी, दीपिका गायकवाड, शंकर आय हॉस्पिटलचे विजय बामणे, अविनाश पानग्रही, हर्षवी शिंदे, प्राजक्ता गायकवाड आदींसह नागोठणे शहर व परिसरातील नागरिक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.




